अखेर ठरलं! ‘NCPSP’… राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मिळालं नवीन नाव

अखेर ठरलं! ‘NCPSP’… राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मिळालं नवीन नाव
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानंतर शरद पवार गटाची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. आज शरद पवार गटाच्या नव्या पक्षाच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे दिसून येत आहे. एक्स या सोशल मीडिया अकाऊंटनुसार त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार (Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar : NCPSP) ही नवी ओळख मिळाली आहे.

मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाबाबत मोठा निर्णय निवडणूक आयोगाने दिला. हा निकाल अजित पवार गटाच्या बाजून मिळाला. त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. आज शरद पवार गटाकडून त्यांच्या नव्या पक्षाच्या नावाबाबत मोठी माहिती मिळाली. शरद पवार गटाच्या एक्स अकाऊंटचे नाव बदलण्यात आल्यानंतर त्यांच्या नव्या पक्षावर शिक्कामोर्त झाल्याची चर्चा आहे. (NCPSP)

शरद पवार गटाच्या एक्स अकाऊंटवर दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार अशी त्यांची नवी ओळख असणार आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला पक्ष आणि चिन्हाबाबत आज निर्णय घेण्याबाबत आदेश दिलेले होते. या आदेशानंतर त्यांच्या एक्स पोस्टवर नाव बदलल्याचे दिसून आले आहे. तसेच पुण्यातील कार्यालयावरुन चिन्ह देखील हटवण्यात आले आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news