आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादीचा सोलापुरात सर्व्हे ?

राष्ट्रवादीचा सोलापुरात सर्व्हे
राष्ट्रवादीचा सोलापुरात सर्व्हे
Published on
Updated on

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे येथील 'द स्ट्रेलेमा' कंपनीच्या 50 जणांच्या टीमकडून सोलापूर शहर व जिल्ह्यात सर्व्हे करण्यात येत आहे. हा सर्व्हे राष्ट्रवादीकडून सुरू असल्याची चर्चा आहे.

मागील 15 दिवसांपासून सर्व्हे सुरू असून शहर उत्तर आणि शहर दक्षिण, शहर मध्य मतदारसंघात चाचपणी झाली आहे. व्यापारी, वकील, डॉक्टर, माजी नगरसेवक, राजकीय विश्लेषक यांच्यासह सामान्य नागरिकांशी गाठीभेटी घेऊन तिन्ही मतदारसंघात विधानसभेच्या निवडणुकीसाठी कोणत्या पक्षाला पोषक वातावरण आहे, कोणता उमेदवार निवडून येईल यासाठी चाचपणी होत आहेत. अक्कलकोट, माळशिरस, मोहोळ, मंगळवेढा या तालुक्यातही सर्व्हे करण्यात येणार आहे.

पिंपरी – चिंचवडच्या विधानसभेच्या पोट निवडणुकीत पुण्याच्या 'द स्ट्रेलेमा' या कंपनीने अचूक पद्धतीने सर्व्हे केला होता. त्यांचा हा अंदाज खरा ठरला होता. दरम्यान, त्याच पार्श्वभूमीवर या कंपनीकडून सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीसाठी चाचपणी करण्यात येत आहे. दरम्यान, सोलापूर शहरातील प्रमुख शहर उत्तर आणि शहर दक्षिण मतदारसंघ पिंजून काढला आहे. येथील प्रमुख व्यापारी, डॉक्टर, ज्येष्ठ नगरसेवक, सामान्य नागरिक, इतर पक्षातील ज्येष्ठ नेते यांच्याशी चर्चा केली आहे.

शहर उत्तर, दक्षिण, मध्यमध्ये कोणत्या उमेदवारास पोषक वातावरण आहे का, उमेदवार निवडून येण्यासाठी काय आवश्यक आहे. यासाठी येथील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, वकिलांसह विविध जणांची गाठीभेटी घेऊन माहिती जाणून घेतली आहे. मंगळवेढा, मोहोळ, माळशिरस, अक्कलकोट या तालुक्यातही सर्व्हे करण्यात येणार आहे.

सक्षम उमेदवार दिल्यास परिवर्तन शक्य

शहर उत्तर मध्ये 70 टक्के नागरिक सध्याच्या आमदारांच्या विरोधात आहेत. इतर पक्षाकडून सक्षम उमेदवार देत नसल्यामुळे वारंवार भाजपचा एकच आमदार निवडून येत आहे. त्यामुळे सक्षम उमेदवार दिल्यास यंदाच्या निवडणुकीत परिवर्तन घडेल, असा सर्व्हे सांगत आहे. शहर मध्यमध्ये काँग्रेसची जादू कायम असून एमआएमची क्रेझ कमी होत असल्याचे सांगण्यात आले. शहर दक्षिण मतदारसंघात विद्यमान भाजप आमदारांच्या विरोधात वातावरण असून त्यांच्या कामावर जनता नाखूष असल्याचे सर्व्हेतून निष्पन्न झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news