अंधेरी पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा ठाकरे गटाला पाठिंबा : शरद पवार

शरद पवार
शरद पवार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईतील अंधेरी मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्याच
पोटनिवडणुकीसाठी शिंदे गट आणि शिवसेना यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी या पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाला राष्ट्रवादीचा पाठिंबा जाहीर केला आहे. पवार पुणे येथे एका कार्यक्रमासाठी आले असता पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

यावेळी त्यांनी दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात सुरू असलेल्या आरोपप्रत्यारोपांवर भाष्य केले. दसरा मेळावा वरून दोन्ही गटामध्ये स्पर्धा सुरु आहे. या मेळाव्यात कुणी मर्यादा ओलांडू नये, कटुता वाढेल असे वर्तन कोणीही करू नये, असे आवाहन त्यांनी दोन्ही गटाला केले आहे.

दरम्यान, अंधेरी पूर्व येथील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी आज (दि. ३) पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पोटनिवडणुकीत शरद पवार यांनी उद्धव ठाकरे गटाला पाठिंबा जाहीर केला आहे.

हेही वाचलंत का ?  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news