Kolhapur News | जयंत पाटील आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यात बंद खोलीत चर्चा, नेमकं कारण काय?

जयंत पाटील
जयंत पाटील
Published on
Updated on

जयसिंगपूर : पुढारी वृत्तसेवा शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या निवासस्थानी शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी भेट दिली. यावेळी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबाबत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व आमदार जयंत पाटील यांच्यामध्ये बंद खोलीत चर्चा झाली. शिवाय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे मुख्यमंत्री शिंदे गटाला पाठिंबा दिलेले आमदार असून त्यांनी खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. अशातच महाविकास आघाडीच्यावतीने आमदार जयंत पाटील यांनी यड्रावकर यांची भेट घेतल्याने चर्चेला उत आहे. (Kolhapur News)

गेल्या चार दिवसांपासून हातकणंगले लोकसभा मतदारसंघात अत्यंत गतीने घडामोडी होत आहेत. महाविकास आघाडीचे नेते शिरोळ विधानसभा मतदारसंघात उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांच्या प्रचारार्थ निवडणुकीच्या नियोजनासाठी भेटीगाठी घेत आहेत. शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मुख्यमंत्री शिंदे गट यांना पाठबळ दिले आहे. त्यामुळे आमदार आमदार यड्रावकर हे खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारात उतरले आहेत.

अशातच गुरुवारी रात्री राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आमदार राजेंद्र पाटील यांच्या निवासस्थानी येऊन आमदार राजेंद्र पाटील यांच्याशी बंद खोलीत चर्चा केली. महाविकास आघाडीचे नेते आमदार यड्रावकर यांच्याशी चर्चा केल्याने मतदार संघात चर्चेला उत आला आहे. मात्र बंद खोलीत झालेल्या चर्चेचा मात्र संदर्भ मिळून आला नाही. यावेळी जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील उपस्थित होते. (Kolhapur News)

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news