NCP Crisis : अजित पवार अध्यक्ष झाल्याचे इतिवृत्त कोठे आहे? निवडणूक आयोगाचा सवाल

NCP Crisis : अजित पवार अध्यक्ष झाल्याचे इतिवृत्त कोठे आहे? निवडणूक आयोगाचा सवाल

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर त्याचे इतिवृत्त कुठे आहे, असा सवाल निवडणूक आयोगाच्या वतीने अजित पवार गटाला विचारण्यात आला; तर २०१९ च्या पहाटेच्या शपथविधीवेळी सर्व आमदार भाजपसोबत जायच्या तयारीत होते, म्हणून अजित पवारांनी शपथ घेतली. यावेळी शरद पवारांची भूमिका वेगळी होती म्हणजे तेव्हाही पक्षात सर्व आलबेल नव्हते, असा युक्तिवाद आज अजित पवार गटाचे वकील मुकुल रोहतगी यांनी केला.

भुजबळांनी सुचवले होते

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ताबा कुणाचा यावर निवडणूक आयोगात सोमवारपाठोपाठ मंगळवारी सुनावणी पार पडली. पुढची सुनावणी ८ डिसेंबरला होणार आहे. दरम्यान, सोमवारपासून अजित पवार गटाचा युक्तिवाद सुरू झाला. आजच्या युक्तिवादात पक्षांतर्गत निवडणूक न घेता शरद पवार यांनी नेमणुका केल्या तसेच छगन भुजबळ यांनी अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे नेतृत्व करावे असे ३० जूनला सुचविले होते, असेही सांगण्यात आले.

सुनावणीदरम्यान शरद पवार यांची निवड चुकीची आहे, तर अजित पवार यांनी त्यांचे नाव राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी कसे सुचवले, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवार यांची निवड झाली तर त्याची निवडणूक इतिवृत्त कुठे आहे, असा प्रश्न निवडणूक आयोगाच्या वतीने अजित पवार गटाल विचारण्यात आला.

पक्षाच्या घटनेच्या विरोधात

आजच्या सुनावणीत आमच्याकडे असलेल्या आमदारांची संख्या जास्त आहे हे आम्ही दाखवले. पक्ष स्थापन झाला तेव्हापासून निवडणुका झाल्या नाहीत आण्डि हे पक्षाच्या घटनेच्या विरोधी आहे हे आम्ही आयोगाला सांगितल्याचे अजित पवार गटाचे वकील मुकुल रोहतगी म्हणाले. य सुनावणीला शरद पवार गटाकडून खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार वंदना चव्हाण, युवक प्रदेशाध्यक्ष्- मेहबूब शेख उपस्थित होते. अजित पवार गटाकडून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, पार्थ पवार उपस्थित होते.

आमच्या पक्षाच्या वतीने आमच्या वकिलांनी युक्तिवाद केला. महाराष्ट्र, झारखंड, नागालँडचे आमदार आमच्या सोबत आहेत हे सांगितले. शुक्रवारी आमच्याकडून युक्तिवाद पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. तसेच शरद पवार गटाकडून उपस्थित केलेल्या मुद्द्यांचे कायदेशीर खंडन आमच्याकडून करण्यात आले.

– सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष, अजित पवार गट

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news