![NCP Crisis Sharad Pawar Meeting Live : शरद पवार गटाच्या बैठकीला १६ आमदार तर ५ खासदार उपस्थित; वाय बी सेंटरमध्ये बैठक सुरू](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F07%2FUntitled-design-2023-07-05T125845.287.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात रविवारी भूकंप झाल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांचे आज (बुधवार) मुंबईत शक्तिप्रदर्शन होत असून, शरद पवार आणि अजित पवार यांनी त्यासाठी बैठका बोलावल्या आहेत. आजच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून सर्व आमदारांना 'व्हिप' बजावला आहे. या बैठकींतून काका – पुतण्याच्या गटांना किती आमदारांचा पाठिंबा आहे, हे स्पष्ट होणार आहे. राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादीच्या या पेचप्रसंगात मुंबईत एकाच वेळी दोन वेगवेगळ्या बैठका होत आहेत. शरद पवार गटाची मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सध्या बैठक सुरू आहे.