NCP Crisis : क्या हुआ तेरा दादा? व्हिडिओ शेअर करत NCP चा अजित पवारांवर निशाणा

NCP Crisis : क्या हुआ तेरा दादा? व्हिडिओ शेअर करत NCP चा अजित पवारांवर निशाणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही काळात महाराष्ट्रात राजकीय स्थित्यंतरे बरीच झाली. एकनाथ शिंदे यांनी भाजपशी युती केली आणि ते मुख्यमंत्री झाले, तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. काही महिन्यातच महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षात बंड करत शिंदे-फडणवीस यांच्याशी युती करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या भूमिकेनंतर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षासह चिन्हावर आपला दावा दाखल केला. आणि वाद सुरु झाला. आता राष्ट्रवादीने आपल्या अधिकृत 'X' अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट करत म्हटलं आहे की, क्या हुआ तेरा दादा? जाणून घ्या त्या व्हिडिओमध्ये काय आहे. (NCP Crisis)

राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या अधिकृत 'X' खात्यावर "फडणवीसांवर एकेकाळी हटकून टीका करणारे दादा, भाजपच्या फसवेगिरीचे वाभाडे काढणारे दादा, आज दादांनाच विचारायची पाळी आली आहे, हे काय करून घेतलंत दादा! महाराष्ट्रातील जनता इमानदारांच्या आणि निष्ठावंतांच्या पाठीशीच कायम उभी राहिली आहे, हा इतिहास आहे!" असं लिहित एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. 

"माजी टीकाकार प्रस्तूत, नको, नको ही कमळाबाई असं लिहीत अजित पवार यांचा फोटो त्या व्हिडिओमध्ये दिसतो. त्यानंतर अजित पवार यांचे काही कार्यक्रमादरम्यानचे संवाद पाहायला मिळतात. या व्हिडिओमध्ये अजित पवार म्हणत आहेत, "माझ्याच बारामती परिसरात येवून तिथं महाराष्ट्रातील धनगर समाजाला आश्वासन दिले की, आमच्या सरकारने पहिल्या कॅबिनेटला धनगर समाजाला आरक्षण देतो. तर आता कुठे आहेत फडणवीस. आता त्या भागात त्यांच्या नावाने गाणं लावलं जात आहे, "क्या हुआ तेरा वादा.? यानंतरच्या क्लिपमध्ये अजित पवार म्हणत आहेत, "जाणीवपूर्वक जातीमध्ये, धर्मामध्ये, पंथामध्ये  अंतर पाडण्याच काम आणि त्यातूनच आपली राजकीय पोळी भाजता येते का, अशा प्रकारचा प्रयत्न आताचे फडणवीस-शिंदे सरकार करतयं. पुढच्या क्लिपमध्ये ते म्हणतात, "घोटाळे करुनच हे मुख्यमंत्री झाले आहेत. तर घोटाळा आणि मुख्यमंत्री हे काय सुटायला तयार नाही. पुढे म्हणत आहेत, "स्टील ३६ हजार रुपये टन होते आता ते ६० हजार टन झाले आहे. हे अच्छे दिन", असेही राष्ट्रवादीने आपल्या अधिकृत 'X' अकाउंटवरून पाेस्‍ट केलेल्‍या व्हिडिओमध्‍ये दिसत आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news