NCP Crises: अजित पवारांची भूमिका ‘स्पष्टच’, शरद पवारांची ‘विरोधाभासी’- सुनिल तटकरे

NCP Crises
NCP Crises

पुढारी ऑनलाईन डेस्क: राष्ट्रवादीत फूट नसून, अजित पवार आमचेच नेत असल्याचे विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत बोलताना केले होते. दरम्यान अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी अजित पवार यांची एनडीए सोबत जाण्याची भूमिका 'स्पष्ट' आहे, पण शरद पवारांची भूमिका ही 'विरोधाभासी' असल्याचे स्पष्ट केले आहे. या संदर्भात त्यांनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत एक्स वरून (ट्विटर) स्पष्टीकरण दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत एक्सवरून तटकरे यांनी म्हटले आहे की, आदरणीय पवार साहेब एका बाजूला अजित पवार हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार असल्याचे बोलतात तर दुसऱ्या बाजूला ते अजित पवारांसोबत गेलेल्या नऊ मंत्र्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची भूमिका घेतात, हा स्पष्ट विरोधाभास आहे. पण सध्या अजित पवार हे घटनेने दिलेल्या शपथेनुसार उपमुख्यमंत्री, वित्त नियोजन मंत्रीच आहेत, असेही अजित पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

NCP Crises: अजित पवार यांची भूमिका स्पष्टच – तटकरे

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरच आम्ही सत्तेतील युती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आमच्या एनडीए प्रवेशाबाबत कोणताही संभ्रम असण्याचे कोणतेही कारण नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत प्रदेशाध्यक्ष म्हणून मी काम करत आहे, असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांच्या दिल्लीतील एनडीएच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार प्रफुल पटेल आणि अजितदादा पवार उपस्थित राहिले. राज्यातील एनडीएच्या खासदारांच्या बैठकीला मी स्वत: उपस्थित होतो. तसेच अविश्वास ठरावा दरम्यान आम्ही एनडीएकडून उपस्थित होतो. यातून अजित पवार यांची भूमिका स्पष्ट होते, असेही सुनिल तटकरे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news