Naxals Killed: तेलंगणा-छत्तीसगड सीमेवर चकमक; सुरक्षा दलाची मोठी कारवाई, तीन नक्षलवादी ठार

Naxals Killed: तेलंगणा-छत्तीसगड सीमेवर चकमक; सुरक्षा दलाची मोठी कारवाई, तीन नक्षलवादी ठार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: तेलंगणा-छत्तीसगड सीमेवरील पुजारी कांकेरच्या करिगुटा जंगलात छत्तीसगड पोलिस आणि नक्षवाद्यांमध्ये आज (दि.६) चकमक झाली.  नक्षलविरोधी अभियानात तीन नक्षलवादी ठार झाले आहेत. पोलिस आणि सुरक्षा दलाची ही मोठी कारवाई मानली जात आहे. घटनास्थळावरून नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत, या संदर्भातील वृत्त एएनआयन दिले आहे. (Naxals Killed)

गेल्या आठवडाभरापासून ३ महिलांसह 13 नक्षलवादी ठार

तेलंगणाच्या सीमेला लागून असलेल्या घनदाट जंगलात शनिवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले. येथील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, परिसरात शोध मोहीम अजूनही सुरू आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन महिलांसह किमान 13 नक्षलवादी ठार झाले. (Naxals Killed)

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news