संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नौदलाचे हेलिकॉप्टर कोची येथील आयएनएस धावपट्टीवर कोसळले, एक ठार

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कोचीमधील आयएनएस गरुड या नौदल हवाई स्थानकाच्या धावपट्टीवर आज (दि.४) चेतक हेलिकॉप्टर ( Navy helicopter )  कोसळले. या अपघातात नौदलाच्‍या एका खलाशाचा मृत्‍यू झाला आहे, असे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे.

भारतीय नौदलाने एका निवेदनात म्हटले आहे की, "कोची येथील नौदल हवाई तळ INS गरुडा येथे जमिनीच्या देखभालीच्या तपासणीदरम्यान चेतक हेलिकॉप्टरच्या अपघातात एका नौदलाच्या खलाशाचा मृत्यू झाला. नौदलाने अपघाताचे कारणाची चौकशी करण्‍यात येत आहे."

logo
Pudhari News
pudhari.news