नवरात्रौत्सव २०२३ : गौरी

छायाचित्र : पार्वती, स्टेट म्युझियम, भोपाळ • छायाचित्र अधिकार : डॉ. सुरुची पांडे.
छायाचित्र : पार्वती, स्टेट म्युझियम, भोपाळ • छायाचित्र अधिकार : डॉ. सुरुची पांडे.
Published on
Updated on


ध्यानमग्न पार्वतीचं रूप म्हणजे 'गौरी' होय! पण तिचं महत्त्वाचं लक्षण म्हणजे 'गोधासना भवेत गौरी' हे होय. याचा अर्थ काय? तर गोधा वर म्हणजे घोरपडीवर जी उभी असते, ती पार्वती, 'गौरी' या नावाने ओळखावी. 'गूढ' राहण्याची, गुप्त राहण्याची सवय हे घोरपडीचं एक वैशिष्ट्य. पार्वतीनं जेव्हा पंचाग्नी तप- (चोहो बाजूंनी प्रज्ज्वलित अग्निकुंड आणि माथ्यावर तळपता सूर्य) करायचे ठरविले, तेव्हा तिने लोकांपासून दूर, शांत, एकांतात राहणाऱ्या गोधाची-घोरपडीची वाहन म्हणून निवड केली. अगदी अचूकपणे हा भाव व्यक्त करणाऱ्या पार्वतीची शिल्पाकृती भोपाळ येथील स्टेट म्युझियममध्ये आहे. घोरपडीवर उभी असलेली चिंतनात रमलेली पार्वती आपल्याला तिथे दिसते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news