Satara Lok Sabha | शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर, साताऱ्यातून शशिकांत शिंदेंच्या उमेदवारीवर शिक्कोमोर्तब

Satara Lok Sabha |  शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर, साताऱ्यातून शशिकांत शिंदेंच्या उमेदवारीवर शिक्कोमोर्तब
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्रजी पवार पक्षाने लोकसभा निवडणूक २०२४ साठी उमेदवारांची तिसरी यादी बुधवारी (दि.१०) जाहीर केली. पक्षाने साताऱ्यातून (Satara Lok Sabha) शशिकांत शिंदे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे. (Lok Sabha Elections 2024 NCP- Sharadchandra Pawar) तर रावेरमधून श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

अमर काळे- वर्धा
भास्कर भगरे- दिंडोरी
सुप्रिया सुळे- बारामती
डॉ. अमोल कोल्हे- शिरुर
निलेश लंके- अहमदनगर
बजरंग सोनवणे- बीड
सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे- भिवंडी
शशिकांत शिंदे- सातारा
श्रीराम पाटील- रावेर

तुतारीच्या साथीने महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत अधिक बुलंद करण्यासाठी 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार' पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाने लोकसभा निवडणूक २०२४ ची तिसरी उमेदवार यादी जाहीर केली असल्याचे पक्षाने X वर पोस्ट करत म्हटले आहे.

महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पक्षांमध्ये सुरू असलेल्या वादावर मंगळवारी पडदा पडला होता. जागावाटपाच्या सूत्रात शिवसेना मोठा भाऊ ठरला. ठाकरे गट २१ जागांवर तर काँग्रेस १७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) १० जागांवर लढणार आहे. सांगलीची जागा ठाकरे गटच लढविणार असून भिवंडी राष्ट्रवादी (शरद पवार) लढणार आहे. राष्ट्रवादीने (शरद पवार) भिवंडीतून सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.

साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात शशिकांत शिंदे

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने साताऱ्यातून शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे साताऱ्यात उदयनराजे यांच्याविरोधात शशिकांत शिंदे असा सामना होणार आहे. साताऱ्यातील विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृती कारणास्तव लोकसभा निवडणूक लढण्यास नकार दिला. मुलगा सारंग यास पक्षाने उमेदवारी द्यावी, यासाठी त्यांनी प्रयत्न केला. पण मुलाच्या बाबतीत पक्ष सकारात्मक नसल्यामुळे मागील आठवड्यात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव चर्चेत आले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी या चिन्हावर आपण निवडणूक लढू शकत नाही, असे चव्हाण यांनी स्पष्ट केल्यामुळे साताऱ्यातून कोणाला उमेदवारी दिली जाईल याकडे लक्ष लागले होते. अखेरीस शरद पवार यांच्या सूचनेनुसार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. तर रावेरमधून श्रीराम पाटील यांच्या नावावर मोहोर उमठवली. (Satara Lok Sabha)

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news