पुणे बाजार समितीसाठी राष्ट्रवादीमध्ये 5 जागांसाठी काथ्याकुट, 15 पैकी 10 जागांची उमेदवारी घोषित

पुणे बाजार समितीसाठी राष्ट्रवादीमध्ये 5 जागांसाठी काथ्याकुट, 15 पैकी 10 जागांची उमेदवारी घोषित
Published on
Updated on

[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="DESC" orderby="post_date" view="circles" /]

किशोर बरकाले

पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलने 15 पैकी 10 उमेदवारांची पहिली यादी शुक्रवार 14 एप्रिल रोजी जाहीर केली आहे. घोषित जागांमध्ये राष्ट्रवादीला 9 आणि शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला 1 जागा देण्यात आलेली आहे. बाजार समितीच्या 20 वर्षानंतर होणार्‍या निवडणुकीमुळे इच्छुकांची भाऊगर्दी झाली असून अजूनही 5 जागांवरील उमेदवारांच्या नावांबाबत काथ्याकुट सुरु असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

विकास सोसायटीच्या 11 पैकी 7 जागा आणि ग्रामपंचायत मतदार संघाच्या 4 पैकी 3 जागांवरील उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. त्यामध्ये विकास सोसायटी मतदार संघातून (सर्वसाधारण गट) शेखर सहदेव म्हस्के (कळस), संतोष आबासाहेब कांचन (उरुळीकांचन), अशोक सुदाम गायकवाड (कोलवडी), योगेश बाळासाहेब शितोळे (न्हावी सांडस) यांचा समोवश आहे. तसेच इतर मागासवर्गीय प्रवर्गातून सचिन बाळासाहेब घुले (उंड्री), महिला प्रवर्गातून सरला बाबुराव चांदेरे (बाणेर), विमुक्त जाती-भटक्या जमाती प्रवर्गातून अर्जुन पिलाजी मदने (कोलवडी) यांचा समावेश आहे. तर ग्रामपंचायत मतदार संघात सर्वसाधारण गटातून महाराष्ट्र केसरी राहुल रामचंद्र काळभोर (लोणी काळभोर), शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रामकृष्ण हेमचंद्र सातव (वाघोली) आणि आर्थिक दुर्बल प्रवर्गातून नवनाथ रोहिदास पारगे (डोणजे) यांचा समावेश आहे.

नातेवाईकांना संधी

बाजार समितीच्या माजी संचालकांच्या नातेवाईकांनी पॅनेलमधील पहिल्या यादीत स्थान मिळविले आहे. घोषित यादीमध्ये राष्ट्रवादीचे नेते व पुणे बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश म्हस्के यांचे बंधु शेखर मस्के तसेच माजी संचालक बाबुराव चांदेरे यांच्या पत्नी सरला यांना पॅनेलमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती पूजा पारगे यांचे पती नवनाथ पारगे यांनाही संधी देण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.

"राष्ट्रवादी काँग्रेस, मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलचे काही उमेदवार राष्ट्रवादीचे नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सूचनेनुसार आज जाहीर करण्यात आलेले आहेत. उर्वरित दोन दिवसांत 5 उमेदवारांची नांवे घोषित करण्यात येतील. पुणे बाजार समितीची विस्कटलेली घडी पुन्हा बसविण्यासाठी आणि जागतिक दर्जाची बाजार समिती तयार करण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत.
– प्रदिप गारटकर , जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news