पणजी, विवेक कुलकर्णी : महाराष्ट्राच्या महिला संघाचे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील तलवारबाजी क्रीडा प्रकारातील आव्हान सोमवारी (दि.३०) उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. महिला सांघिक फॉइल गटात तामिळनाडूकडून महाराष्ट्राने ४५-३५ अशी हार पत्करली. महाराष्ट्राच्या संघात वैदेही लोहिया, हर्षदा दामकोंडवार, अंकिता साळुंखे आणि ज्योती सुतार यांचा समावेश होता. महाराष्ट्राने आतापर्यंत तलवारबाजीमध्ये एक रौप्य आणि दोन कांस्य अशी एकूण तीन पदके मिळवली आहेत.