बंगळूर; पुढारी ऑनलाईन : राष्ट्रीय पुरस्कार विजेते पार्श्वगायक शिवमोग्गा सुबन्ना यांचे निधन झाले आहे. ते ८३ वर्षाचे होते. कर्नाटकातील बंगळूर येथील श्री जयदेव इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओव्हस्कूलर सायन्सेस अँड रिसर्च येथे त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. सुबन्ना हे प्रसिद्ध कन्नड गायक होते. त्यांना कन्नड सूगम संगीत क्षेत्रातील नामवंत गायक म्हणून त्यांना ओळखले जात होते. संगीत क्षेत्रात येण्यापूर्वी ते पेशाने वकील होते. सुबन्ना यांनी प्रसिद्ध कवींच्या कविता गीतमालाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवल्या.
सुबन्ना यांनी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड लेखक कुवेम्पू यांनी लिहिलेल्या गाण्यांना आवाज दिला. कुवेंपू यांनी लिहिलेले बारिसू कन्नड दिंडीमावा हे गाणे त्यांनी गायल्यानंतर ते कर्नाटकातील घराघरात पोहोचले.
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना जयदेव रिसर्च रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगी, मुलगा असा परिवार आहे. सुबन्ना यांनी ज्ञानपीठ विजेत्या कवितांना संगीत दिले. त्यांना १९७८ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यांना 'काडू कुडुरे ओडी बानडिट्टा' या गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. पेशाने वकील असणाऱ्या सुबन्ना यांनी प्रसिद्ध कन्नड कवी केवी पुट्टपा, दा रा बेंद्रे आणि अन्य कवींच्या कविता सुरेल आवाजाने रसिकांपर्यंत पोहोचवल्या. राष्ट्रीय पुरस्कारासोबतच २००६ मध्ये त्यांना कन्नड कंपू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कुवेंपु विद्यापीठाकडून त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली होती.
हे ही वाचा :