Nashik ZP Exam : जि.प. च्या पाच संवर्गातील परीक्षा आचारसंहितेत सापडण्याची शक्यता

जिल्हा परिषद नाशिक
जिल्हा परिषद नाशिक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गेल्या वर्षी राज्यातील वर्ग ३ आणि वर्ग ४ संवर्गाच्या विविध पदांसाठी ७५ हजार जागांची मेगाभरती १५ ऑगस्टपर्यंत करण्यात येण्याची घोषणा झाली होती. यामधील ग्रामविकास विभागातील अनेक पदांच्या परीक्षा झाल्या असून, काही संवर्गाच्या परीक्षांच्या तारखाच जाहीर झाल्या नाहीत. आचारसंहितेमध्ये परीक्षा होतील की पुढे जातील याबाबत साशंकतेचे वातावरण विद्यार्थ्यांमध्ये आहे.  (Nashik ZP Exam)

नाशिक जिल्हा परिषदेंतर्गत एकूण २० संवर्गामधील १०३८ रिक्त पदांकरिता जाहिरात देण्यात आली होती. त्यानुसार २६ डिसेंबर २०२३ पर्यंत १५ संवर्गाकरिता ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली असून, कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्यसेवक ४० टक्के (पुरुष), आरोग्यसेवक ५० टक्के (पुरुष), आरोग्यसेवक (महिला) आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका या ५ संवर्गांच्या परीक्षा नियोजित आहे. या पदांच्या ६८१ जागा असून, या परीक्षा शासनाच्या मान्यतेनुसार घेण्यात येणार आहेत.

दरम्यान, आतापर्यंत १५ संवर्गातील परीक्षा आयबीपीएस या संस्थेकडून ऑनलाइन परीक्षा घेण्यात आल्या आहेत. यातील ७ सवंर्गातील परीक्षांचे निकाल शासनाच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आले आहेत. उर्वरित परीक्षांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाही. याशिवाय ५ संवर्गातील परीक्षांचे वेळापत्रकदेखील जाहीर करण्यात आलेले नाही.

बाकी असलेली पदे- जागा

(कंत्राटी) ग्रामसेवक – 50

आरोग्य पर्यवेक्षक – 3

आरोग्य परिचारिका [आरोग्यसेवक (महिला)] – 597

आरोग्यसेवक (पुरुष) 40% – 85

आरोग्यसेवक (पुरुष) 50%– 126

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news