नाशिक : सीएनजी दरवाढीविरोधात युवक राष्ट्रवादीकडून काळे सोने वाटून निषेध

राष्ट्रवादीचे काळे सोने वाटून आंदोलन,www.pudhari.news
राष्ट्रवादीचे काळे सोने वाटून आंदोलन,www.pudhari.news
Published on
Updated on

नाशिक : पुढारी ऑनलाइन 

नाशिक शहरात सीएनएजीच्या दरात प्रति किलोमागे चार रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे. सीएनजी गॅस ९२ रुपयांवरुन आता ९६ रुपयांवर पोहचला असल्याने वाहनधारकांची पुन्हा एकदा डोकेदुखी वाढली आहे.  सतत वाढणाऱ्या पेट्रोल – डीझेलच्या किमतीला पर्याय म्हणून वाहनधारक नैसर्गिक वायू कडे वळलेले असताना नैसर्गिक वायूच्या किमतीही झपाट्याने वाढत असल्याने त्याच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सीएनजी पंपावरील ग्राहकांना काळी आपट्याची पाने वाटत उपहासात्मक आंदोलन केले.

दसऱ्याच्या सणाला धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते. त्याचे प्रतिक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पाने वाटण्याची प्रथा आहे. महागाईमुळे नागरिकांचे सर्वच सणावर पाणी फिरलेले असताना मोदी सरकार नवनवीन माध्यमातून जनतेला महागाईच्या खाईमध्ये ढकलत आहे. पेट्रोल-डिझेलच्या सतत वाढणाऱ्या किमतीला पर्याय म्हणून सरकारने नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या वाहनांचा पर्याय दिला व त्यानुसार वाहनधारक त्याकडे वळाले सुद्धा परंतु सद्यस्थितीत डीझेलच्या किमतीपेक्षा सीएनजीची किमती जास्त असल्याने वाहनधारकांना आपल्या कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आल्याची टीका यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी केली.

यावेळी बाळा निगळ, जय कोतवाल, विशाल डोके, निलेश भंदुरे, सागर बेदरकर, राहुल कमानकर, अमोल नाईक, डॉ.संदीप चव्हाण, निलेश सानप, संतोष भुजबळ, हर्षल चव्हाण, सुनिल घुगे आदींसह मोठया संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नैसर्गिक वायूच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असून राज्याचे मुख्यमंत्री सत्कार स्वीकारण्यात व विविध सणांच्या आनंदोत्सवात व्यस्त आहे. वाढती महागाई, अतिवृष्टीने झालेले पिक नुकसान, शेतकऱ्यांची नुकसान भरपाई व नागरिकांच्या इतर जिवंत प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे – अंबादास खैरे

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news