नाशिक : लाकडी फळी पडल्याने युवकाचा मृत्यू

नाशिक :  लाकडी फळी पडल्याने युवकाचा मृत्यू

नाशिक : गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत डोक्यात लाकडी फळी पडल्याने १८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. अरुण कुमार मांडवी (१८, रा. नवशा गणपती मंदिराजवळ, गंगापूर रोड) असे या युवकाचे नाव आहे. अरुण हा अर्चित कन्स्ट्रक्शन येथे काम करत असताना शुक्रवारी (दि.३१) सकाळी त्याच्या डाेक्यात लाकडी फळी पडली. त्यामुळे त्यास श्रीगुरुजी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा रविवारी (दि. २) सायंकाळी मृत्यू झाला. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news