Nashik Water Supply | शुक्रवारी शहरातील निम्म्या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

Nashik Water Supply | शुक्रवारी शहरातील निम्म्या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सातपूर विभागातील प्र.क्र.९ कार्बन नाका व शिवाजीनगर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मनपा शाळेजवळ १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीला थेट गळती सुरू झाल्याने दुरुस्तीसाठी शुक्रवारी (दि.२३) सकाळी ९ पासून सातपूर विभागातील प्रभाग ८, १० व ११ तसेच नाशिक पश्चिम विभागातील प्रभाग ७ व १२ मधील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शनिवारीदेखील कमी दाबाने कमी प्रमाणात पाणीपुरवठा होईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

सातपूरमधील प्रभाग क्र. ८ मधील बळवंतनगर जलकुंभ परिसर, सोमेश्वर कॉलनी, सुवर्णकारनगर रामेश्वरनगर, बेंडकुळेनगर, पाटील पार्क परिसर, नवशा गणपती परिसर, पाटील पार्क, आनंदवली, सावरकर नगर, पाइपलाइन रोड, काळे नगर, सद्गुरूनगर, खांदवेनगर, गणेश कॉलनी, सुयोग कॉलनी, कामगारनगर, गुलमोहर विहार, विवेकानंद नगर, निर्मल कॉलनी, काळेनगर, शंकरनगर, चित्रांगण सोसायटी परिसर, मते नर्सरी रोड परिसर तसेच प्रभाग १० मधील अशोकनगर, जाधव संकुल, समृद्धीनगर, वास्तूनगर, विवेकानंदनगर, पिंपळगाव बहुला गावठाण, राज्य कर्मचारी सोसायटी परिसर, सात माउली, संभाजीनगर, राधाकृष्णनगर व इतर परिसर, प्रभाग क्र. ११ मधील बुद्धनगर व इतर परिसर तर नशिक पश्चिम विभाग प्रभाग क्र. ७ येथील नहुष जलकुंभ परिसर, नरसिंहनगर, पूर्णवाद नगर, अरिहंत हॉस्पिटल परिसर, दातेनगर, अयोध्या कॉलनी, तेजोप्रभा आनंदनगर, डी. के. नगर, शांतीनिकेतन सोसायटी परिसर, आयचितनगर परिसर, चैतन्यनगर परिसर, सहदेवनगर परिसर, पंपिंग स्टेशन परिसर, चव्हाण कॉलनी, श्रमिक कॉलनी, माणिकनगर व इतर परिसर सावरकरनगर, दातेनगर, रामनगर, उदय कॉलनी, नेर्लीकर हॉस्पिटल परिसर, जेहान सर्कल परिसर आणि प्रभाग क्र. १२ मधील रामराज्य जलकुंभ परिसर, यशवंत कॉलनी, कल्पनानगर, डिसूझा कॉलनी, कॉलज रोड व इतर परिसर डिसूझा कॉलनी, शिवगिरी सोसायटी, कॉलेज रोड परिसर, एस. टी. कॉलनी परिसर, शहीद चौक परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news