नाशिक : शहरात दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग

File Photo
File Photo
Published on
Updated on

नाशिक : दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये संशयितांनी अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याचे समोर येत आहे. या प्रकरणी गंगापूर व म्हसरूळ पोलिस ठाण्यांत पोक्सोसह विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत.

गंगापूर पोलिस ठाण्यात सातपूर येथील जगतापवाडी परिसरात राहणाऱ्या पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, नातलगाने मद्यसेवन करून तिच्यासह अल्पवयीन मुलीचा वारंवार विनयभंग केला. संशयिताने दोघींचा शारीरिक व मानसिक छळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे, तर दुसऱ्या घटनेत म्हसरूळ येथील स्नेहनगर परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा संशयित ओमकार गायकवाडने जुलै २०२२ ते एप्रिल २०२३ या कालावधीत वारंवार पाठलाग करीत तसेच तिच्या घरी जाऊन विनयभंग केला. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news