पेठ : येथील चिखली गावानजीक वनविभागाने जप्त केलेल्या सागवान लाकडासमवेत वनविभागाचे अधिकारी व कर्मचार. (छाया: राहुल पगारे) 
पेठ : येथील चिखली गावानजीक वनविभागाने जप्त केलेल्या सागवान लाकडासमवेत वनविभागाचे अधिकारी व कर्मचार. (छाया: राहुल पगारे) 

नाशिक : चिखली गावालगत सागवानाची कत्तल

Published on
नाशिक (पेठ) : पुढारी वृत्तसेवा
पेठ तालुक्यातील  चिखली गावानजीक वनविभागाने सव्वा लाख रुपये किमतीचे सागवान झाडाचे लाकूड जप्त केले आहे.
चिखली गावानजीक वनविभागाच्या कंपार्टमेंटमध्ये मौल्यवान सागाच्या झाडांची कत्तल करुन ते गुजरात  राज्यात विक्री करून वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती वनविभाग प्रादेशिकच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार पथकाने बुधवार दि.(२३) रोजी मध्यरात्री सापळा रचला. सागवान झाडांची कत्तल करुन ठेवलेले सागचे चौपाट केलेले पंधरा नग १.९४२ घन. मीटर सुमारे १,२५,००० रूपये किमतीचे लाकूड जागेवर बेवारस स्थितीत आढळून आले. ते ताब्यात घेेेेत पेठ येथे आणण्यात आले. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी पुढील तपास करीत आहेत. उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली भुवन परिमंडळ अधिकारी तानाजी भोये, वनरक्षक धनराज वाघमारे, हरिदास  मिसाळ, जितेंद्र गायकवाड, किरण दळवी, मजहर शेख, रोजंदारीवरील वनमजुर आदींनी यशस्वी कामगिरी केली.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news