नाशिक : सिन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाचे चित्र स्पष्ट

नाशिक : सिन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाचे चित्र स्पष्ट

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा

सिन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाची निवडणूक आज होत आहे. सभापती पदी कोण विराजमान होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच सिन्नर बाजार समिती सभापती पद निवड नियुक्तीबाबतचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे गटाचे संचालक शशिकांत गाडे व नवनाथ नेहे यांनी आज सोमवार (दि.२६) रोजी थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. माजी आमदार वाजे यांच्या संपर्क कार्यालयात हा प्रवेश समारंभ झाला असून त्याचेही फोटो वायरल होत आहेत. तसेच माजी आमदार राजाभाऊ वाजे यांची ही सरशी की, आमदार माणिकराव कोकाटे यांची नवीन चाल याबाबत तर्कवितर्क सुरू आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news