Nashik | इंटरनॅशनल ‘मिठाई’ मध्ये गुळाचा गोडवा वाढला

Nashik | इंटरनॅशनल ‘मिठाई’ मध्ये गुळाचा गोडवा वाढला
Published on
Updated on

गूळ ही एक अपरिष्कृत नैसर्गिक साखर आहे, जी कोणतेही रसायन न जोडता तयार केली जाते. यामुळेच भारताच्या गुळाला जगभरातून मोठी मागणी असते. गुळला आता इंटरनॅशनल मिठाई म्हणून ओळ‌ख मिळू लागली आहे. अपेडाच्या आकडेवारीतून हेच समोर येत असून, भारतातून जगभरातील ५० हून अधिक देशांमध्ये गुळाची निर्यात होत आहे. भारतातून एप्रिल ते डिसेंबर २०२३ या ९ महिन्यांत ३ लाख ७६ हजार ९५२ मेट्रिक टन गुळाची निर्यात होऊन देशाला २५७८ कोटींचे परकीय चलन मिळाले आहे.

भारतातून इंडोनेशिया, केनिया, नेपाळ, यूएसए, युनायटेड अरब या देशांमध्येही गुळाला मोठी मागणी आहे. एकूण निर्यातीपैकी या पाच देशांत १९१२ कोटी रुपयांचा गूळ निर्यात झाला आहे. इंडोनेशियात सर्वाधिक भारतीय गुळाचे सेवन करण्यात येते. दरवर्षी वाढते गुळाची निर्यात – गुळाचे सर्वांत जास्त उत्पादन हे महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात होते. अनेक गुऱ्हाळे गावांमध्ये तयार करण्यात येतात. मागणी वाढल्यामुळे गुऱ्हाळांची संख्यादेखील वाढत आहे. जगभरातून गुळाची मागणी वाढत असल्याने उत्पादनदेखील वाढत आहे.

जागतिक गुळाच्या एकूण उत्पादनापैकी ७० टक्केपेक्षा जास्त उत्पादन भारतात होते. गूळ 'औषधी साखर' म्हणून ओळखला जातो आणि पौष्टिकदृष्ट्या मधाशी तुलना करता येतो. भारतीय आयुर्वेदिक औषध घसा आणि फुफ्फुसाच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी गूळ फायदेशीर मानते. परिष्कृत साखरेमध्ये प्रामुख्याने ग्लुकोज आणि फ्रक्टोज असतात, तर गुळात ग्लुकोज आणि सुक्रोज असतात. पण गुळात खनिजे आणि जीवनसत्त्वेदेखील असतात, ज्यात शुद्ध साखर नसते. गुळातील खनिज सामग्रीमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि लोह आणि जस्त आणि तांबे यांचा समावेश आहे. व्हिटॅमिन सामग्रीमध्ये फॉलिक अॅसिड आणि बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे समाविष्ट आहेत.

औषधी साखर म्हणून गुळाला मागणी
गूळ संधिवाताच्या त्रासांना प्रतिबंधित करते तसेच पित्तविकार कमी करणे, थकवा, स्नायू, नसा आणि रक्तवाहिन्या आराम करण्यास गुळाची मदत होते. रक्तदाब राखणे आणि पाणी धारणा कमी करणे, हिमोग्लोबिन पातळी वाढवणे, अशक्तपणा प्रतिबंधित करते. यात अनेक औषधी गुणधर्म असल्याने गुळाला देशासह विदेशात मोठी मागणी आहे.

निर्यात आणि परकीय चलन
२०१९ -२० – ३ लाख ४१ हजार मे.टन १६३३ कोटी
२०२० -२१ – ६ लाख ३१ हजार मे.टन २६५९ कोटी
२०२१ -२२ ५ लाख ५१ हजार मे.टन २७९८ कोटी
२०२२ -२३ ७ लाख ६१ हजार मे.टन ४३३० कोटी

या देशांतून मिळाले चलन
इंडोनेशिया          २०५ कोटी
केनिया               ११८ कोटी
नेपाळ                ११४ कोटी
यूएसए               ११४ कोटी
युनायटेड अरब    ११३ कोटी

औषधी गुणधर्म म्हणून गुळाला जागतिक स्तरावर मोठी मागणी आहे. जगभरातील एकूण

गूळ उत्पादनापैकी 60 ते 70 टक्के गूळ भारतात उत्पादित होतो. भविष्यात सेंद्रिय पद्धतीने उसाचे उत्पादन घेऊन सेंद्रिय पद्धतीनेच गूळ आणि गुळाची पावडरचे उद्योग सुरू झाले पाहिजे. जेवढा खर्च आणि जेवढे तंत्रज्ञान आपण साखर कारखाना बनवण्यासाठी वापरतो ते जर गुळासाठी वापरले तर गूळ उत्पादनाला आणि निर्यातीला वाव मिळेल. 

– सचिन आत्माराम होळकर, कृषितज्ज्ञ, लासलगाव. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news