नाशिक : कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च

पंचवटी : परिसरात रूट मार्चप्रसंगी पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर कड व कर्मचारी. (छाया : गणेश बोडके)
पंचवटी : परिसरात रूट मार्चप्रसंगी पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर कड व कर्मचारी. (छाया : गणेश बोडके)

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागण्याची शक्यता असल्याने पोलिस यंत्रणादेखील सज्ज झाली आहे. त्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पंचवटी पोलिसांकडून पंचवटी परिसरात रूट मार्च काढण्यात आला.

विविध पक्षांकडून लोकसभा निवडणुकीचे उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते. लोकसभा निवडणुकीत कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी व गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा, त्या दृष्टीने पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रूट मार्च काढण्यात आला. रूट मार्चला पेठ रोडवरील फुलेनगर येथील तीन पुतळ्यांपासून सुरुवात करून पेठ रोडमार्गे पेठ फाटा, दिंडोरी नाका, पंचवटी कारंजा, मालेगाव स्टँडमार्गे रामकुंडापर्यंत काढण्यात आला.

यात पोलिस निरीक्षक मधुकर कड, पोलिस निरीक्षक नंदन बगाडे यांच्यासह पाच अधिकारी, २५ कर्मचारी तसेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल व २४ होमगार्ड, दामिनी पथक, निर्भया पथक, वाहने, सीआर व्हॅन, पिटर मोबाइल आदी सहभागी झाले होते.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news