Nashik News | गोदा महोत्सवात दीड दिवसांत १४ लाखांची उलाढाल

नाशिक : गोदा महोत्सवात स्वयंसहायता समुहाला प्रमाणपत्र देउन गौरविताना ललित बुब, प्रमोद वाघ. समवेत प्रकल्प संचालिका प्रतिभा संगमनेरे यांचेसह निमा आणि आयमाचे पदाधिकारी.
नाशिक : गोदा महोत्सवात स्वयंसहायता समुहाला प्रमाणपत्र देउन गौरविताना ललित बुब, प्रमोद वाघ. समवेत प्रकल्प संचालिका प्रतिभा संगमनेरे यांचेसह निमा आणि आयमाचे पदाधिकारी.

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातील डोंगरे मैदान येथे मंगळवार (दि. ६)पासून सुरु असलेल्या गोदा महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी शहरातील व्यावसायिक खरेदीदारांनी हजेरी लावली. 'निमा' व 'आयमा' या औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व इतर सर्व सदस्य उपस्थित होते. दिड दिवसांत या महोत्सवात सहभागी समूहांना नाशिककरांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे तब्बल १४ लाख ४२ हजार ९३५ रुपये एवढी विक्री झालेली आहे.

नाशिक व छत्रपती संभाजीनगर विभागातील स्वयंसहाय्यता समूहांचे विभागीय व नाशिक जिल्ह्याचे जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनाचे आयोजन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अंतर्गत करण्यात आले आहे. यावेळी आयमाचे उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, वरिष्ठ सचिव प्रमोद वाघ, सचिव हर्षद बेळे, खजिनदार गोविंद झा, सहसचिव योगिता आहेर, सदस्य मनीष रावल, अभिषेक व्यास, दिलीप वाघ, धीरज वडनेरे, निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, राजेंद्र वडनेरे, जिल्हा अभियान व्यवस्थापक बंडू कासार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उत्कृष्ट फुड प्रकार आणि सर्वसाधारण प्रकारामध्ये गुणानुक्रम काढून संबंधित स्टॉलला प्रमाणपत्रे देउन गौरविण्यात आले.

आयमाचे अध्यक्ष ललित बूब यांनी, ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादने चांगल्या दर्जाचे निर्मित करीत आहेत. परंतु, त्यांना स्थानिक बाजारपेठेसह ऑनलाइन बाजारपेठ देखील उपलब्ध करता येऊ शकते असे सांगितले. प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांनी, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

नाशिक विभाग (फूड प्रकार गट)
प्रथम – मोरया महिला स्वयं सहाय्यता समूह, नाशिक.
द्वितीय – सरस्वती महिला स्वयं सहाय्यता समूह, नाशिक.
तृतीय – महालक्ष्मी महिला स्वयं सहाय्यता समूह, कळवण.
उत्तेजनार्थ – तू ही निरंकार महिला स्वयं सहाय्यता समूह, मालेगाव.

सर्वसाधारण गट
प्रथम – सावित्रीबाई फुले गट, इगतपुरी.
द्वितीय – श्री साई महिला स्वयं सहाय्यता समूह, नाशिक.
तृतीय – सप्तश्रृंगी महिला स्वयं सहाय्यता समूह, नांदगाव.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news