Nashik News : नाशिक बनणार गतिरोधकांचे शहर

Nashik News : नाशिक बनणार गतिरोधकांचे शहर
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– रस्ता सुरक्षा समितीने मंजुरी दिल्यानुसार वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी शहरातील रस्त्यांवर ३३३ गतिरोधक नव्याने तयार केले जाणार आहेत. शहरातील प्रमुख चौक, शाळा, सरकारी कार्यालये, धार्मिक स्थळांसह गर्दीच्या ठिकाणी रस्त्यांवर गतिरोधकासह इतर उपाययोजना केल्या जाणार आहेत. यासंदर्भातील कामांच्या निविदा अंतिम केल्या असून, पुढील आठवड्यात संबंधित मक्तेदारांना महापालिकेतर्फे कार्यादेश दिले जाणार आहेत.

रस्त्यावरील गतिरोधक मानदुखी, पाठदुखीस कारणीभूत ठरतानाही वाढत्या अपघातांना आळा घालण्याच्या नावावर रस्ता सुरक्षा समितीकडे सुमारे साडेचारशेहून अधिक ठिकाणी गतिरोधक उभारण्याचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. या प्रस्तावांची तपासणी व छाननीसाठी रस्ते सुरक्षा समितीची उपसमिती गठीत केली होती. या समितीत महापालिकेचे उपअभियंता, प्रादेशिक परिवहन अधिकारी, शहर वाहतूक शाखेचा प्रत्येकी एक अधिकारी, के. के. वाघ इंजिनिअरिंग कॉलेजमधील डॉ. विलास पाटील, शासकीय तंत्रनिकेतनचे प्रा. रवींद्र सोनोने यांचा समावेश होता. या उपसमितीने अर्जांची तपासणी करून ३३३ ठिकाणी गतिरोधकासह विविध उपाययोजनांची गरज असल्याचा अहवाल दिला होता. यासाठी महापालिकेने सात कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील निविदा प्रक्रिया अंतिम झाली असून, लवकरच संबंधित मक्तेदाराला महापालिकेकडून कार्यादेश दिले जाणार आहेत. त्यानंतर १५ दिवसांत गतिरोधक टाकण्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी दिली.

२३ ठिकाणी सिग्नल बसविणार

शहरातील अपघातप्रवण क्षेत्रांच्या ठिकाणी गतिरोधकासह झेब्रा क्रॅासिंग, स्पीड टेबल, थर्मोप्लास्टिक पेंटने पट्टे मारणे, कॅट आय बसविणे, रोड मार्कर, हॅजार्ड मार्कर, सूचनाफलक, नो पार्किंग फलक आदी उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्याचबरोबर २३ ब्लॅक स्पॉटवर सिग्नल बसविण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.

विभागनिहाय गतिरोधक

विभागगतिरोधक संख्या
पूर्व68
पश्चिम36
पंचवटी89
नाशिकरोड48
सिडको60
सातपूर32

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news