![दिलीप दातीर ,www.pudhari.news](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F05%2F%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AA-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B0.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नाशिक : नाशिकचे मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांना अटक करण्यात आली आहे. भोंग्याविरोधातील आंदोलनानंतर दिलीप दातीर हे पोलिसांना गुंगारा देत होते. त्यानंतर आज दिलीप दातीर यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या पाथर्डी फाटा येथील युनीट 2 ने ही कारवाई केली आहे.
भोंग्याविरोधातील आंदोलनात नाशिकचे मनसे सैनिक प्रचंड मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले होते. याच दरम्यान पोलिस नाशिक मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांच्या शोधात होते. आज पोलिसांनी दिलीप दातीर यांना पाथर्डी फाटा हॉटेल स्काय क्लार्क येथून सकाळी १० वाजता ताब्यात घेतले. मात्र जिल्हाध्यक्ष अंकुश पवार अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
यापूर्वी आंदोलनादरम्यान पोलिसांनी मनसेच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेले आहे. काहींना हद्दपारीची नोटीसही देण्यात आली आहे.