नाशिक बिबट्याची बातमी : शेताच्या बांधावर आढळला मृत बछडा

नाशिक बिबट्याची बातमी : शेताच्या बांधावर आढळला मृत बछडा

नाशिक (सिन्नर, विंचुरी दळवी) : पुढारी वृत्तसेवा

सिन्नर तालुक्यातील विंचुरी दळवी येथे बिबट्याच्या मादीच्या पाच ते सहा महीन्याच्या बछड्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

विंचूरी दळवी येथे सोमवार (दि.११) सकाळच्या सुमारास विंचुरी दळवी परीसरातील गट.नं.499 शेरी मळा येथील भागात रमेश शेळके यांच्या शेतातील बांधावर चार ते पाच महिने वय असलेला बिबट्या मादीचा बछडा मृत अवस्थेत आढळून आला आहे.

सोमवार (दि.११) सकाळच्या सुमारास रमेश शेळके व गोविंद दळवी हे त्यांच्या शेतातील गहू पिकावर लक्ष देण्यासाठी शेतात गेले असता त्यांना बिबट्या मादीचा बछडा मृत अवस्थेत आढळून आला. त्यांनी तत्काळ दै. पुढारीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधत वन अधिकारी मनिषा जाधव यांना माहीती दिली. त्यानंतर तातडीने वनरक्षक गाढवे व वनसेवक रामदास हरळे यांना घटनास्थळी येऊन पाहणी केली. या बछड्याचा मृत्यु नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकले नसून शवविच्छेदनानंतर पुढील तपास लागणार आहे अशी माहीती वन कर्मचार्‍यांनी दिली आहे.

विंचुरी दळवी : मृत बिबट्याची पाहणी करताना वन कर्मचारी. (छाया : विकास दळवी)
विंचुरी दळवी : मृत बिबट्याची पाहणी करताना वन कर्मचारी. (छाया : विकास दळवी)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news