नाशिक : शिक्षकाच्या बनावट भरतीतून सहा वर्षे लाटले शासकीय वेतन

नाशिक : शिक्षकाच्या बनावट भरतीतून सहा वर्षे लाटले शासकीय वेतन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आयटीआयमध्ये बनावट शिक्षक भरती प्रकरण उघडकीस आले असून, या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात संस्थेच्या अध्यक्ष, संचालक मंडळासह, प्राचार्य व शिक्षकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकारी प्रवीण श्रीधर पाटील (४८) यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. पाटील यांच्या फिर्यादीनुसार, मालेगाव येथील योगी रामसुरतकुमार शैक्षणिक संस्थेत मे २०१७ ते जून २०२३ या कालावधीत देवेंद्र हिरामण निकम हे शिक्षक म्हणून कार्यरत होते. मात्र, संस्थेच्या तत्कालीन अध्यक्ष, सचिव, सर्व संचालक मंडळ, तत्कालीन प्राचार्य यांनी संगनमत करून निकम यांच्या नावे बनावट कागदपत्रे व दस्तऐवज तयार करून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सादर केले होते. त्या आधारे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी निकम यांची मालेगाव येथील रावळगावमधील डॉ. प्रशांत दादा हिरे माध्यमिक विद्यालयात बोगस नियुक्ती करून जून २०१७ ते जून २०२३ या कालावधीत वेतन घेत शासनाची फसवणूक केली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news