नाशिक : ध्रुव नगरला चिमुकलीचा खून

नाशिक : ध्रुव नगरला चिमुकलीचा खून

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गंगापूर रोड वरील ध्रुव नगर परिसरात तीन महिन्याच्या चिमुकलीचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चिमुकलीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार अज्ञात महिलेने आईला बेशुद्ध करुन चिमुकलीचा खून केला.

धॄवंशी रोकडे (रा.ध्रुवनगर, गंगापूर राेड) असे खून झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. साेमवारी (दि.20) रात्री हा प्रकार उघडकीस आला. ध्रुवंशीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, त्या धृवंशीसोबत घरात एकटे असतांना एका अज्ञात महिलेने घरात शिरुन आईला बेशुद्ध केले तर मुुलीचा गळा चिरला आणि महिला पसार झाली. घटनेची माहिती कळताच परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, गंगापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख व अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तपासास सुरुवात केली. याप्रकरणी चिमुकलीच्या आईसह इतर नातलगांचीही चाैकशी सुरु आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news