नाशिक : उपआयुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी पदभार स्वीकारला

नाशिक : उपआयुक्त पवार यांच्याकडून पदभार स्वीकारताना साताळकर.
नाशिक : उपआयुक्त पवार यांच्याकडून पदभार स्वीकारताना साताळकर.

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गेल्या आठवड्यात उपजिल्हाधिकारी पदावरून महापालिकेच्या उपआयुक्तपदी बदली करण्यात आलेल्या लक्ष्मीकांत साताळकर यांनी अखेर बुधवारी (दि.१४) पदभार स्वीकारला. बदली होऊनदेखील साताळकर यांच्याकडून पदभार स्वीकारला जात नसल्याने पालिका वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, त्यांनी पदभार स्वीकारल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

नियमबाह्य पदोन्नती प्रकरणामुळे वादग्रस्त ठरलेल्या उपआयुक्त मनोज घोडे-पाटील यांची तडकाफडकी बदली करीत, साताळकर यांची त्याजागी नेमणूक करण्यात आली. त्यानंतर घोडे-पाटील अचानक रजेवर गेल्याने अन् बदली रोखण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न केले जात असल्याच्या चर्चा समोर आल्याने, साताळकर पदभार स्वीकारतील की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्याचबरोबर साताळकर यांना महसूल विभागाने पदमुक्त केले नसल्याचीही चर्चा समोर आल्याने, प्रशासन उपआयुक्तपदी साताळकर की पुन्हा घोडे-पाटील अशा चर्चांना मनपा वर्तुळात उधाण आले होते. दरम्यान, मंगळवारी साताळकर यांना महसूल विभागातून कार्यमुक्त करून नगरविकास विभागात दोन वर्षांसाठी प्रतिनियुक्तीवर पाठविल्याचे आदेश काढल्यानंतर साताळकर यांनी बुधवारी महापालिकेत पदभार स्वीकारला.

आयुक्तांच्या नावाचा सस्पेन्स
डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बदली करण्यात आल्याने, नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी कोण? या प्रश्नाचा सस्पेन्स १४ व्या दिवशीही कायम असल्याचे दिसून आले. आतापर्यंत आयुक्त पदासाठी अनेक नावे समोर आली असली तरी, कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाईल हा प्रश्नच आहे. सध्या मनपा कर्मचाऱ्यांमध्ये आयुक्तांच्या नावारून चर्चा रंगत आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news