Nashik Crime : इंदिरानगर परिसरात हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड

Nashik Crime : इंदिरानगर परिसरात हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहराच्या चहुबाजूने हॉटेल व्यवासयिकांनी बस्तान बसविले असून, बहुतांश हॉटेलमध्ये सरार्स हुक्का पार्लर सुरू असल्याची ओरड नेहमी ऐकण्यास मिळते. आता थेट इंदिरानगर परिसरासारख्या भरवस्तीत सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्लरवर पोलिसांनी धाड टाकून हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकाने ही कारवाई केली.

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या संकल्पनेतून निर्माण करण्यात आलेल्या अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकाला आयुक्तालयाच्या हद्दीत अवैधरित्या अंमली पदार्थ बाळगणाऱ्या व विक्री करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. या पथकाला उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल द पेरू फार्म इंदिरानगर येथे अवैधरित्या हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे पथकाने हॉटेल पेरू येथे छापा टाकता तिथे सात इसम प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन करताना आढळून आले. या कारवाईत हुक्का पॉट, हुक्का फ्लेवर व इतर साहित्य असा १६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

दरम्यान, या प्रकरणी हॉटेल मालक शंकर राजाराम पांगरे (३०, रा. टाईम्स ब्लॉसम अपार्टमेंट चौथा मजला,पांगरे मळा बडदे नगर,नाशिक) व हॉटेलचा मेनेजर नितीन शांताराम आहिरे (२६,रा.पेरूचा बाग,इंदिरानगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक एच. के. नागरे, हवालदार भामरे, डंबाळे, कोल्हे, भालेराव, येवले, नांद्रे आदींनी कारवाईत सहभाग नोंदविला.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news