Nashik Fraud News : किराणा व्यावसायिकाचा पेट्रोल पंप सुरु करण्यासाठी अर्ज, 46 लाखांची फसवणूक

Nashik Fraud News : किराणा व्यावसायिकाचा पेट्रोल पंप सुरु करण्यासाठी अर्ज, 46 लाखांची फसवणूक
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिकराेड येथील किराणा व्यावसायिकाने वेबसाईटमार्फत पेट्राेल पंप मिळविण्यासाठी अर्ज केला असता, सायबर चाेरट्यांनी या व्यावसायिकास ४६ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. त्यानुसार सायबर पाेलीस ठाण्यात अनाेळखी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

नाशिकराेडच्या गाेसावीवाडी परिसरात राहणारे ४७ वर्षीय संताेष कटारे यांनी पेट्राेल पंप आणि त्याचे लायसन्स मिळण्यासाठी ऑईल कंपन्यांच्या वेगवेगळ्या वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज केेले हाेते. कटारे यांनी १ जानेवारी राेजी तिसऱ्यावेळी प्रयत्न करुन अर्ज केला. त्याचवेळी अनाेळखी संशयितांनी कटारे यांना व्हाटस् अॅपवर संपर्क साधत आम्ही इंडियन ऑईल कंपनीचे अधिकारी असल्याचे सांगून पेट्राेल पंपासाठी अर्ज मिळाल्याचे सांगितले. त्यामुळे कटारे यांचा विश्वास बसला. यानंतर संशयितांनी कटारे यांना पेट्राेल पंपासाठी लागणारे कागदपत्रे तसेच लायसन्स फी, प्राेसेसिंग फी भरण्यास सांगितले. 'पेट्राेल पंप मिळणारच' या उत्साहामुळे संशयितांनी कटारे यांना सांगेल त्या बँक खात्यावर पैसे भरण्यास सांगितले. टप्प्याटप्प्याने त्यांनी ४६ लाख रुपये भरले. तरीही संशयित काही ना काही कारण सांगून पैसे मागत राहिले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी नाशिक गाठून शहर सायबर पाेलीस ठाण्यात घटना कथन केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news