नाशिक शहर सोमवापासून निर्बंधमुक्त ; ना. भुजबळांची घोषणा

नाशिक शहर सोमवापासून निर्बंधमुक्त ; ना. भुजबळांची घोषणा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; नाशिक शहराने कोरोना निर्बंध शिथिल करण्याबाबत शासनाचे सर्व मापदंड पूर्ण केले आहेत. येत्या साेमवारपासून (दि.२१) शहर निर्बंधमुक्त करण्यात येत असल्याची घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली. ग्रामीण भागात लसीकरणाचे प्रमाण कमी असल्याने तूर्तास ग्रामीण भागाला कोणताही दिलासा देण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे शहरातील सर्व व्यवहार पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि.१८) पालकमंत्री भुजबळ यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरण डी., पोलिस आयुक्त दीपक पांडेय, मनपा आयुक्त कैलास जाधव, जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांच्यासह अन्य अधिकारी ऊपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news