नाशिक : महाराष्ट्राच्या चित्ररथाचे सप्तशृंगगडावर मोठया उत्साहात आगमन

सप्तशृंगगड : गडावरील पहिली पायरीवर रथाची पूजा करण्यात येऊन ग्रामस्थांनी मोठ्या संख्येत हजेरी लावली.  (छाया: तुषार बर्डे)
सप्तशृंगगड : गडावरील पहिली पायरीवर रथाची पूजा करण्यात येऊन ग्रामस्थांनी मोठ्या संख्येत हजेरी लावली. (छाया: तुषार बर्डे)

नाशिक (सप्तशृंगगड) :  पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्राचे अर्थशक्तिपीठ म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर शुक्रवारी (दि.१७) दिल्ली येथे प्रजासत्ताकदिनी द्वितीय क्रमांकाने गौरवलेल्या महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तिपीठ चित्ररथाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले. गडावर मुक्कामी आलेल्या रथासोबत माहिती प्रसारण विभागाचे काही अधिकारी होते. शुक्रवारी सकाळी चित्ररथाची शिवालय तलाव येथून मिरवणूक काढली. पहिली पायरी येथे रथाची पूजा झाली. प्रसंगी सर्व भाविकांसह ग्रामस्थ, विश्वस्त संस्था उपस्थित होते. गावातून वाजतगाजत मिरवणूक काढली. रथाचा दिल्लीत प्रजासत्ताकदिनी झालेला सन्मान हा श्रीक्षेत्र सप्तशृंगगडासाठीही अभिमानाची बाब असल्याने ग्रामस्थांसह भाविकांनी आनंद व्यक्त केला. यावेळी महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या. मिरवणुकीसाठी संस्थानचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, तहसीलदार कापसे, सरपंच पवार आदी ग्रामस्थ यांनी नियोजन केले.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news