नाशिक : सावतानगरला तरुणीचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी थेट एटीएम मध्ये…

नाशिक : सावतानगरला तरुणीचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी थेट एटीएम मध्ये…
Published on
Updated on

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

सावतानगर परिसरातील महालक्ष्मी चौक मंदिरासमोर असलेल्या एसबीआय बॅकेच्या एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या तरूणी कडून गाडीवरील ताबा सुटल्याने दुचाकी एटीेएम मध्ये घुसून तरूणीच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये तरूणीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून प्राथमिक उपचारासाठी जवळच्याच एका दवाखान्यात दाखल केले आहे.

सदर ची घटना ही बाजूलाच असलेल्या एका दुकानाच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. गौरी प्रदीप सैदाने वय वर्ष १८ रा. खांडे मळा, सावता नगर, सिडको असे मुलीचे नाव असून गौरी ही सकाळी ९.३० च्या सुमारास घरातून निघाली. सावतानगर परिसरातील महालक्ष्मी चौक मंदिरासमोर असलेले एसबीआय बॅकेच्या एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेली व पैसे काढुन बाहेर आल्या नंतर तीने दुचाकी सुरु केली असता तिचा आपल्या गाडी वरचा ताबा सुटल्याने तिच्याकडून गाडी डायरेक्ट समोरच असलेल्या एस.बी.आय च्या एटीएमध्ये घुसली तसेच या अपघाता मध्ये तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

या घटनेची माहिती कळताच अंबड पोलिस स्टेशनचे कर्मचारी तेथे दाखल झाले. तसेच पोलिसांनी ही माहिती एस बी आय बँकेला कळविल्याने बँकेचे कर्मचारी देखील या ठिकाणी दाखल झाले. या अपघाता मध्ये तेथूनच जाणारे एक वयस्कर बाबा हे देखील दैवी कृपा असलेल्याने बचावले असे प्रतक्षदर्शी नागरिकांनी सांगितले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news