नाशिक : सुभाष रोडवरील बारदानाच्या गोडाऊनला भीषण आग

नाशिकरोड: बारदान गोदामाला आग लागल्याने निघत असलेले धुराचे लोट
नाशिकरोड: बारदान गोदामाला आग लागल्याने निघत असलेले धुराचे लोट

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क
नाशिकरोड परिसरातील आनंद कॉम्प्लेक्सच्या समोर सुभाष रोड, सोमनाथ बाबा चाळ येथील बारदानाच्या गोडाऊनला आग लागल्याने नागरिकांनी गर्दी केली आहे. आगीची घटना, सकाळच्या सुमारास साडे नऊ वाजता घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून आगीची मोठे मोठे लोट परिसरात पसरत आहेत.

अन्वर उमर खान, सुकडू उमर खान, बारदान वाले यांच्या मालकीचे हे बारदान गोदाम आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याचे रहिवाशांकडून सांगितले जात आहे. अग्नीशामन दलाला पाचारण करण्यात आले असून  कर्मचाऱ्यांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. तर अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल आहेत. परिसरातून धुराचे लोट पसरत असल्याने नागरीकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news