नर्गिस फाखरी म्हणते, ‘माझ्या खोलीमध्ये ६ मृत पक्षी सापडले’

नर्गिस फाखरी
नर्गिस फाखरी

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री नर्गिस फाखरी हिचा 'रॉकस्टार' हा एकमेव चित्रपट चांगला चालला. त्यानंतर तिने मोजक्याच भूमिका केल्या. पण तिच्या कामापेक्षाही तिच्या स्टाईलमुळे आणि आयुष्यामुळे चर्चेत असते. आता तिला एकदा भुताचा अनुभव आला असल्याचा खुलासा तिने केला आहे. करिअर करण्यासाठी नर्गिस परदेशातून भारतात आली. भारतात आल्यावर सुरुवातीच्या काळात ती भाड्याच्या घरात राहात होती. त्यानंतर काही दिवसांनी तिने स्वतःचे घर घेतले. पण या वीन घरात आल्यावर तिला अनेक चित्र-विचित्र अनुभव आले.

एका मुलाखतीत ती म्हणाली, मुंबईत स्वतःचे घर घेतले तेव्हा मी खूप खूश होते. कारण ते घर मी स्वतःच्या मेहनतीने घेतले होते. ते घर पाली हिल रोडवर स्मशानभूमीजवळ होते. त्या घरात राहात असताना मला विचित्र स्वप्नं पडायची आणि अचानक रात्री-अपरात्री जाग यायची. ती स्वप्नं खूप भीतीदायक होती. एक भुतासारखा सहा फूट उंच पांढरे कपडे घातलेला माणूस स्मशानभूमीकडे घेऊन जातोय, स्मशानात हाताने खणायचा, असे मला त्या स्वप्नामध्ये दिसत असे. मी त्या घरात केवळ चार दिवस राहिले. त्यानंतर मी मुंबईहून दिल्लीला शिफ्ट झाले. पण नंतर जी माणसे मुंबईतील माझ्या घरातील सामान पॅक करण्यासाठी आली होती, त्यांनी मला सांगितलं की, त्यांना माझ्या खोलीमध्ये 6 मृत पक्षी सापडले. माझ्या घरात काय सुरू आहे याची मला कल्पना नव्हती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news