Narendra Modi Nashik Visit : मोदींच्या सुरक्षेच्या दृष्टीने ‘हे’ महामार्ग राहणार बंद, वाहतूक मार्गात बदल

Narendra Modi Nashik Visit : मोदींच्या सुरक्षेच्या दृष्टीने ‘हे’ महामार्ग राहणार बंद, वाहतूक मार्गात बदल
Published on
Updated on

जळगांव पुढारी वृत्तसेवा ; नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी  (दि.12) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक दौऱ्यावर असणार आहेत. त्यामुळे या दिवशी धुळे-मालेगांव ते मुंबई पर्यंत राष्ट्रीय महामार्ग व्यावसायिक वाहनांसाठी बंद राहणार आहे. तरी व्यावसायिक वाहनांनी आपली वाहने धुळे किंवा त्यापूर्वी सुरक्षित उभी करावी असे आवाहन ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कांग्रेस व पोलीस उपायुक्त मुख्यालय चंद्रकांत खांडवी नाशिक यांनी केले आहे.

पंतप्रधान मोदींच्या उपस्थित होणाऱ्या या राष्ट्रीय महोत्सवात राज्य व परराज्यातील विविध ठिकाणांहून मोठया प्रमाणात नागरिक हे आपल्या वाहनाने नाशिक शहरात विशेषतः सभेच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्याअनुषंगाने कार्यक्रम स्थळावरील मार्गावर वाहतूकीची कोंडी होवू नये म्हणून खबरदारीची उपाययोजना म्हणून नाशिक आयुक्तालय हद्दीत येणारी मुंबई-आग्रा हायवेवरील मुंबई-धुळे बाजुकडील, पुणे हायवे, औरंगाबाद रोड, दिडोंरीरोड, पेठरोड व त्रंबकरोड बाजुकडून नाशिक शहरात येणारे " अवजड वाहनांना" इतर पर्यायी मार्गाचा वापर करून वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे

प्रवेश बंद मार्ग
१) संतोष टी पॉईंट ते स्वामी नारायण चौकी कडे जाणा-या मार्गावरील वाहतूकीस प्रवेश बंद राहील.
२) तपोवन क्रॉसिग ते कार्यक्रम स्थळी जाणा-या मार्गावरील वाहतूकीस प्रवेश बंद राहील.
३) स्वामी नारायण चौक ते कार्यक्रम स्थळी जाणा-या मार्गावरील वाहतूकीस प्रवेश बंद राहील
(४) काटया मारुती चौक ते सतोष टी पॉईंट कडे जाणा-या मार्गावरील वाहतूकीस प्रवेश बंद राहील
५) अमृतथाम चौफुली ते मिर्ची सिग्नल कडे जाणा-या मार्गावरील वाहतूकीस प्रवेश बंद राहील
| ६) जनार्दन स्वामी मठ टी पॉईंट ते तपोवन कडे जाणा-या मार्गावरील वाहतूकीस प्रवेश बंद राहील
७) लक्ष्मी नारायण मंदिर ते तपोवन कडे जाणा-या मार्गावरील वाहतूकीस प्रवेश बंद राहील
| ८) गिलगीरी बाग पाट चौफुली ते तपोवन कडे जाणा-या मार्गावरील वाहतूकीस प्रवेश बंद राहील
९) बिडीकामगार नगर पाट चौफुली ते जिलगीरी बाग कडे जाणा-या मार्गावरील वाहतूकीस प्रवेश बंद राहील
१०) नांदुर नाका ते तपोवन कडे जाणा-या मार्गावरील वाहतूकीस प्रवेश बंद राहील
11 ) रासबिहारी ते निलगीरी बाग कडे जाणा-या मार्गावरील वाहतूकीस प्रवेश बंद राहील
१२) तारवाला चौक ते अमृतथाम कडे जाणा-या मार्गावरील वाहतूकीस प्रवेश बंद राहील
१३) दिंडोरी नाक ते काटया मारुती चौक कडे जाणा-या मार्गावरील वाहतूकीस प्रवेश बंद राहील
१४) टाकळी गांव अनुसयानगर व गोविंद काठे चौक कडुन सिध्दीविनायक चौक व अमृतथाम कडे जाणा-या मार्गावरील
| वाहतूकीस प्रवेश बंद राहील
१५) सप्तश्रृंगी माता (सिता गुंफा मंदिर) ते काळराम मंदिर कडे जाणा-या मार्गावरील वाहतूकीस प्रवेश बंद राहील.
१६) काळराम मंदिर ते नाग चौक, काटयामारुती चौकी कडे येणा-या व जाणा-या मार्गावरील वाहतूकीस प्रवेश बंद राहील.
१७) सरदार चौक ते काळाराम मंदिराकडे येणार व जाणारा रस्ता वाहतूकीस प्रवेश बंद राहील.
१८) मालेगांव स्टॅण्ड ते रामकुंड, ढिकले वाचलालय गाडेमहाराज पुलापर्यंत येणा-या व जाणा-या वाहतूकीस प्रवेश बंद राहील.

पर्यायी मार्ग
१) व्दारका उड्डाणपुल मार्गे इतरत्र ये-जा करतील. २) व्दारका उड्डाणपुल मार्गे इतरत्र ये-जा करतील. (३) अमृतधाम व रासबिहारी यामार्गे इतरत्र ये-जा करतील
४) पंचवटी कारंजा मालेगांव स्टॅण्ड रविवार कारंजा / बायजाबाई छावणी व रामवाडी ब्रिज मार्गे इतरत्र ये-जा
करतील
५) अमृतधाम चौफुली वरून डाव्या बाजुला वळुन बळी मंदिर उड्डाण पुलावरून इतरत्र ये-जा करतील
६) जनार्दन स्वामी मठ टी पॉईंट ते तपोवन कडे जाणा-या मार्गावरील वाहतूकीस प्रवेश बंद असल्याने इतरत्र मार्गाने
ये-जा करतील.
७) मारूती वेफर्स कडुन डाव्याबाजुला वळुन ट्रॅक्टर हाउस, व्दारका मार्गे इतरत्र ये-जा करतील.
८) जिलगीरी बाग पाट चौफुली ते तपोवन कडे जाणा-या मार्गावरील वाहतूकीस प्रवेश बंद वाहतूकीस प्रवेश बंद
| असल्याने इतरत्र मार्गाने ये-जा करतील.
९) बिडीकामगार नगर पाट चौफुली ते जिलगीरी बाग कडे जाणा-या मार्गावरील वाहतूकीस प्रवेश बंद वाहतूकीस प्रवेश | बंद असल्याने इतरत्र मार्गाने ये-जा करतील.
| १०) नांदुर नाका ते तपोवन कडे जाणारी अवजड वाहतूक ही दि. १२/०१/२०२४ रोजी सकाळी ०६.०० ते कार्यक्रम
संपेपर्यंत बिटको, नाशिक रोड, जेलरोड जत्रा चौफुली मार्गे ये-जा करतील.
११) रासबिहारी वरुन डाव्या व उजव्या रॅम्पवरून उड्डाण पुलावरून इतरत्र ये-जा करतील.
१२) तारवाला चौक ते अमृतधाम कडे येणारी वाहतूक वणी दिंडोरी रोड व पेठ रोड मार्गे इतरत्र ये-जा करतील
१३) दिंडोरी रोड पेठ रोड मार्गे येणारी वाहने पंचवटी कारंजा मालेगांव स्टॅण्ड रविवार कारंजा / बायजाबाई छावणी व रामवाडी ब्रिज मार्गे इतरत्र ये-जा करतील
१४) टाकळी गांव अनुसयानगर व गोविंद काठे चौक कडुन येणारी वाहतूक टाकळी रोडने स्वारबाबा नगर मार्गे व्दारका कडे जाईल व इतरत्र मार्गे ये-जा करतील.
१५) पंचवटी कारंजा मालेगांव स्टॅण्ड रविवार कारंजा/बायजाबाई छावणी व रामवाडी ब्रिज मार्गे इतरत्र ये-जा करतील.
१६) मालेगाव स्टॅण्ड-रविवार कारंजा-मखमलाबाद नाका-बायजाबाई छावणी-रामवाडी पुलामार्गे इतरत्र ये-जा करतील
१७) सरदार चौक ते काळाराम मंदिराकडे येणारी व जाणारी वाहतूक गणेशवाडी पुल (पंचवटी अमरधाम) मार्गे व्दारका व इतस्त्र ये-जा करतील
१८) मालेगांव स्टॅण्ड ते रामकुंड, ठिकले वाचलालय गाडेमहाराज पुलापर्यंत येणारी व जाणारी वाहतूक मालेगाव स्टॅण्ड ते रविकार कारंजा किंवा मखमलाबाद नाका-बायजाबाई छावणी-रामवाडी पुलामार्गे इतरत्र ये-जा करतील.
१९) नाशिक रोड कडुन मुंबईकडे जाणारी अवजड वाहन वाहतूक फेम सिग्नल डीजीप नगर वडाळगांव कलानगर पाथर्डी | रोडने पाथर्डी फाटया मार्गे मुंबई कडे जाईल.
दिनांक १२/०१/२०२४ रोजी मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे तपोवन नाशिक येथील कार्यक्रम निमीत्ताने खालील नमुद मार्गावरील अवजड वाहतुकीस सकाळी ०६.०० ते कार्यक्रम संपेपर्यंत नाशिक आयुक्तालय हद्दीत | वाहतुकीसाठी इतर पर्यायी मार्ग वापरतील.
नमुद मार्गवरील जाणारी सर्व अवजड वाहनांनी इतर पर्यायी मार्गाचा सकाळी ०६.०० ते कार्यक्रम संपेपर्यंत इतर पर्यायी मार्गाचा वापर करतील.
वरील सर्व प्रकारचे निर्बंध हे पोलीस सेवेतील वाहने, रुग्णवाहीका, शववाहीका व अग्निशमन दलाची वाहने यांना लागु राहणार नाही.

वरील निर्बंध हे दिनांक १२ रोजी सकाळी ०६.०० ते कार्यक्रम संपेपर्यंत अंमलात राहतील. तसेच, वरील मार्गात व वेळे मध्ये परिस्थितीनुरूप बदल करण्याचे अधिकार राखून ठेवण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news