उमरखेड ; पुढारी वृत्तसेवा आमची वाहने का अडविता या कारणावरून पेनगंगा नदीजवळ मार्लेगाव येथे कार्यरत असलेल्या नाकाबंदी पथक कर्मचाऱ्यांना अश्लिल भाषेत शिवीगाळ करून पोलीस कर्मचाऱ्याचा मोबाईल फोडल्याची घटना घडली होती. शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी मविआचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांचे पुत्र कृष्णा पाटील आष्टीकर यांच्या विरुद्ध पथक प्रमुखांच्या तक्रारी वरून उमरखेड पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मार्लेगाव येथे तपासणी नाका आहे. येथे येणाऱ्या- जाणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याकरीता पथक प्रमुख रामकिसन शिंदे रा. गोकुळनगर , कृषी सहाय्यक उमरखेड हे पथकातील कर्मचाऱ्यांसह कार्यरत होते. दि. 23 एप्रील रोजी दुपारी 1:10 वाजता हदगाव कडून उमरखेडकडे 8 वाहने येत होती. वाहने तपासणी करीता तेथे कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी संघमित्रा टेंबरे यांनी त्यांना वाहन थांबविण्याकरीता हात दाखविला. परंतू ती वाहने थांबली नाहीत.
त्या नंतर काळ्या रंगाची MH 26 Bx 29 29 नाक्यावर थांबली व तेथे कार्यरत असलेले सहायक प्रकाश पवार यांनी वाहन चालकास डिक्की उघडण्यास सांगितले. तेव्हा तुला वर्दीचा माज आला का? माझी गाडी का अडवतोस मी नागेश पाटील आष्टीकर यांचा मुलगा आहे असे म्हणून पोलीस शिपायाच्या हातातील मोबाईल हिसकावून जमिनीवर फोडला व अश्लिल भाषेत शिवीगाळ केली. शासकिय कामात अडथळा निर्माण केला अशा आशयाच्या तक्रारीवरून संशयीत आरोपी कृष्णा पाटील आष्टीकर व अन्य 3 जणांविरुद्ध उमरखेड पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :