नांदेड : कंधार येथे दर्शनासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा तलावात बुडून मृत्यू

बुडाले
बुडाले

कंधार, पुढारी वृत्तसेवा :  नांदेड, खुदबईनगर येथून कंधार येथील बडी दर्गाहच्या दर्शनासाठी आलेल्या ५ भाविकांचा जगतुंग तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज (दि.२१) दुपारी एकच्या सुमारास घडली. मृत एकाच कुटुंबातील असून तलावाकाठी जेवण करण्यासाठी गेले होते. मोहम्मद शफीउद्दीन मोहम्मद गफ्फार (वय ४५ ) यांचा मुलगा मोहम्मद साद मोहम्मद शफीउद्दीन (वय १५ ), सय्यद सोहेल सय्यद वाहिद (वय २०), सय्यद नवीद सय्यद वाहिद (वय १५), मामा मोहम्मद विखार (वय २३ सर्व रा. खुदबईनगर नांदेड) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद शफीउद्दीन मोहम्मद गफ्फार हा नांदेड येथे बेकरी‌ व्यवसाय करत होते. सर्व आपल्या नातेवाईक व कुटुंबासह कंधार येथील हजरत हाजी सय्याह सरवरे मगदूम (बडी दर्गाह) च्या दर्शनासाठी आज दुपारी एक वाजता आले होते. सर्वांचे दर्शन झाल्यानंतर कुटुंबातील एक महिला जेवण करण्यासाठी तलावाच्या काठावर गेले. जेवण झाल्यानंतर प्लेट धुण्यासाठी तलावाच्या काठावर गेले असता त्यातील एकाचा पाय घसरुन तलावात पडला. त्यास वाचविण्यासाठी एकएक करुन  पाचही जण तलावात बुडू लागले. यावेळी सोबत असलेल्या त्यांच्या कुटुंबातील एका महिलेने पाहिले.

तिने ही माहिती दर्गाहमध्ये असलेल्या त्यांच्या इतर नातेवाईकांना दिली. माहिती कळताच स्थानिक लोकांनी तलावाकडे धाव घेत बुडत असलेल्या पाच जणांना वाचविण्याचा प्रयत्न केला. तात्काळ त्यांना रुग्णवाहिका व रिक्षातून कंधार येथील ग्रामीण रुग्णालय आणले. मात्र, डॉक्टरांनी सर्वांची तपासणी करुन मृत घोषित केले.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news