नागपूर : लग्नाला नकार देणाऱ्या अल्पवयीन तरुणीचा फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

नागपूर : लग्नाला नकार देणाऱ्या अल्पवयीन तरुणीचा फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
Published on
Updated on

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : एका प्रवासादरम्यान ते दोघेही भेटले… एकमेकांचे मोबाईल नंबर शेअर केले… पुढे सोबत वेळही घालवला…. मात्र लग्नासाठी नकार दिल्याने प्रियकराने संतापातून दोघांचे खासगी फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली… त्या प्रियकराला नागपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेणाऱ्या एका १७ वर्षीय तरुणीसोबत सुमारे दीड वर्ष संबंधात राहिल्यानंतर तिने लग्नास नकार दिल्याने संतापलेल्या प्रियकराने तिचे खासगी व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. या संदर्भात पीडितेच्या तक्रारीवरून कपिलनगर पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

अल्पेश (वय २२, रा. पंचशीलनगर) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून ३५४ (ड) आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हाही नोंदविण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, पीडित तरुणी ही १७ वर्षांची आहे. बारावीचे शिक्षण घेतल्यानंतर ती व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेत आहे. पीडिता व अल्पेशची गेल्या दीड वर्षापासून ओळख आहे. एका टूरमध्ये दोघे भेटले. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. दोघांनीही एकमेकांचे मोबाइल नंबर घेतले. सतत संपर्कात राहिल्याने त्यांच्यात प्रेम फुलले. प्रेमाच्या आणाभाका घेत दोघांमध्ये संबंध प्रस्थापित झाले. अल्पेश हा तिच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. मात्र, तो कोणताही काम धंदा करत नसल्याने पीडिता त्याच्यासोबत लग्न करण्यास तयार नव्हती.

दरम्यान, त्याने लग्नासाठी तगादा लावला. ती लग्नास तयार होत नसल्याचे बघून त्याने दोघांचे सोबत असलेले खासगी फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. बदनामीच्या भीतीपोटी पीडित तरुणीने संतापून पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news