नागपूर : खडसेंच्या प्रवेशाला फडणवीस यांचा विरोध नाही, समिती निर्णय घेणार : चंद्रशेखर बावनकुळे

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याबाबत गुढीपाडव्याचा मुहूर्त ठरल्याचे बोलले जात असताना केंद्रीय समितीच प्रवेशाचा निर्णय घेईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कधीही त्यांच्या प्रवेशाला विरोध केला नाही, उलट त्यांच्या ह्रदयामध्ये मानाचे स्थान आहे असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. खडसेंच नव्हे तर कुणासाठीही आमचा पक्ष प्रवेशाचा दुपट्टा तयार असल्याचे सांगितले.

आज (रविवार) माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, पक्षामध्ये येण्यासाठी आम्ही कोणाला नाही म्हणत नाही, कारण शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातला भारत आणि त्या उद्देशासाठी येणारी जी काही लोक आहेत, नेते आहेत त्यांचे स्वागत आहेच. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, लातूरच्या डॉ.अर्चना पाटील चाकूरकर यांचा पक्षप्रवेश झाला आहे. जे जे पक्षामध्ये प्रवेश करतील त्यांचा संघटना वाढवण्यामध्ये उपयोग होणारच आहे. एकनाथ खडसे हे भाजपात येत आहेत, पण त्यांची मुलगी येत नाही? याबाबतीत केंद्रीय तसेच राज्याची समितीच विचार करेल. कारण तुटक-तुटक निर्णय होणार नाहीत असे संकेत दिले.

अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे नेहमीच सर्वांना भेटतात. आम्हीही त्यांना भेटतो. त्यामुळे कुठलाही वाद नाही, पण एक निर्णय प्रक्रिया असून यातून सर्वाना जावे लागते. देवेंद्र फडणवीस यांचे व्यक्तिगत संबंध कुणाशीही वाईट नाहीत. आमचे सर्वांचे एकमत झालं आहे. एक बैठक होईल आणि महायुतीचे जागावाटप अंतिम होईल. साताऱ्यामध्येही जवळपास जागा वाटपावर निर्णय झाला आहे, लवकरच आपल्याला ते दिसेल असे सांगितले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news