नागपूर : समृद्धी महामार्गावर पाठलाग करून २ कोटींची रोकड लुटली

नागपूर : समृद्धी महामार्गावर पाठलाग करून २ कोटींची रोकड लुटली

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : हिंगणा पोलीस स्टेशन अंतर्गत समृद्धी महामार्गावरील कोतेवाडा गावाजवळ २ कोटी रुपये लुटण्याची घटना घडली आहे. आज (दि.३१) सकाळी ही दरोड्याची घटना घडल्याने रात्री या मार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कोतेवाडा गावानजीक इम्पेरियन सिटी परिसरात दोन जण एका कारने जात होते. यावेळी पाठीमागून एका कारमधून आलेल्या ५ ते ६ जणांनी या कारला रोखले. कार थांबल्यानंतर जबरदस्तीने २ कोटी रुपये असलेली बॅग घेऊन चोरटे पसार झाले.

ही रक्कम ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकाची असून समृद्धी महामार्गाने मुंबईला घेऊन जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दोन कोटींपेक्षा अधिक ही रक्कम असू शकते, अशीही शक्यता वर्तविली जात आहे. यापूर्वी देखील समृद्धी महामार्गावर अकोला, वाशिम परिसरात काही लोकांना लुटण्याची घटना उघडकीस आली होती.

आता या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या कारमधून २ कोटींची रोकड नेली जाणार असल्याची माहिती कोणीतरी दिली असावी, त्यानंतर पाठलाग करून ही रोकड लुटण्यात आली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news