नागालँडमध्ये विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला आज गुरूवारी (दि.०२) सुरूवात झाली. २०२३ च्या विधानसभा निवडणूकीसीठी २७ फेब्रुवारीला ६० विधानसभांच्या ५९ जागांसाठी मतदान झाले. यावेळी ७४.३२% लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी एनडीपीपीचे उमेदवार आणि नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रिओ यांनी देखील कोहिमा जिल्ह्यात मतदान केले.
नागालँड विधासभा सदस्य (आमदारांची) संख्या ही ६० आहे. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाला अथवा राजकीय आघाडीकडे ३१ जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे. सध्याची १३ वी विधानसभा निवडणूक असून, या निवडणूकीनंतर २०२३ मध्ये १३ विधानसभा अस्तित्वात येणार आहे.
२०१८ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा सदस्य असलेल्या नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी(NDPP) पक्षाने १८ जागांवर विजय मिळवला. त्यानंतर या पक्षाने भाजपच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले. तर नागा पीपल्स फ्रंटला २५ जागा जिंकून देखील सरकार स्थापन करता आले नाही. २०१८ च्या विधानसभा निवडणूकीत नागा पीपल्स फ्रंट-25, नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी-21, भारतीय जनता पार्टी-12, अपक्ष-2 अशा जागांवर यश मिळवले होते.
२०२३ च्या नागालँड विधानसभा निवडणुकीत भाजपा-एनडीपीपी युतीला मोठा जनादेश मिळाल्याने हे दोन्ही पक्ष सत्तेत आले आहेत. एकूण ६० जागांपैकी भाजप-एनडीपीपी युतीला या निवडणूकीत पुन्हा एकदा बहुमत मिळण्याची शक्यता आहे. नागालँडचे सध्याचे मुख्यमंत्री नेफिओ रिओ यांनी नॉर्थन अंगामी येथून निवडणूक लढवली आहे. यापूर्वी रिओ हे चार वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत आणि ते याआधीच राज्यातील सर्वात जास्त काळ सरकारचे प्रमुख आहेत. ते आणखी एक टर्म मुख्यमंत्रीपदी राहण्याची शक्यता आहे.