Naach Ga Ghuma Movie : ‘नाच गं घुमा’ने पहिल्याच दिवशी केला २.१३ कोटींचा गल्ला

नाच गं घुमा
नाच गं घुमा

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'नाच गं घुमा' चित्रपटाने प्रदर्शनाआधी काही विक्रम प्रस्थापित केलेच, पण प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी १ मे रोजी चित्रपटाने तब्बल २.१३ कोटींचा गल्ला करत विक्रम प्रस्थापित केला. चित्रपटाने प्रदर्शानाधीच २० हजार तिकिटांच्या बुकींगचा विक्रम नोंदविला होता. (Naach Ga Ghuma Movie ) मुंबई, पुणे, ठाणे, नवीन मुंबईसह नाशिक, नागपूर, पिंपरी चिंचवड या केंद्रांवरही चित्रपटाच्या बुकिंगला तुफान प्रतिसाद मिळाला होता. महिला प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची प्रचंड क्रेझ असून त्यांच्या अनेक ग्रुपनी चित्रपटाचे संपूर्ण शो आरक्षित केले आहेत. अनेक महिलांनी तो आपल्या मोलकरणींबरोबर पाहण्याचे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर जेव्हा हा चित्रपट बुधवारी १ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला तेव्हा नवीन विक्रम चित्रपटाने प्रस्थापित केले. (Naach Ga Ghuma Movie)

परेश मोकाशी दिग्दर्शित ' नाच गं घुमा ' मध्ये मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव यांच्या मध्यवर्ती भूमिका असून त्यांच्या जोडीला सुकन्या कुलकर्णी,सुप्रिया पाठारे, सारंग साठे, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत आणि बालकलाकार मायरा वायकुळ या आघाडीच्या आणि नावाजलेल्या कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी यांनी चित्रपटाचे लेखन केले आहे. त्यांच्यासह शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, तृप्ती पाटील आणि स्वप्नील जोशी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news