Naach Ga Ghuma Movie : नाच गं घुमा चित्रपटाचे प्रदर्शनाआधीच २० हजार तिकिटांचे बुकिंग!

Naach Ga Ghuma Movie
Naach Ga Ghuma Movie

पुढारी ऑनलाईन डेस्क : बुकींगचा विक्रम नोंदविला आहे. या चित्रपटाच्या तिकिटांचे आणि शोंचे हे आरक्षण सुरु होण्याआधीच नोंदविले गेले आहे, हे विशेष. मुंबई, पुणे, ठाणे, नवीन मुंबईसह नाशिक, नागपूर, पिंपरी चिंचवड या केंद्रांवरही चित्रपटाच्या बुकिंगला तुफान प्रतिसाद मिळत आहे. (Naach Ga Ghuma Movie) महिला प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची प्रचंड क्रेझ असून त्यांच्या अनेक ग्रुपनी चित्रपटाचे संपूर्ण शो आरक्षित केले आहेत. अनेक महिलांनी तो आपल्या मोलकरणींबरोबर पाहण्याचे जाहीर केले आहे. कथा-पटकथेचे वेगळेपण, दमदार अभिनय आणि आपल्या दैनंदिन जीवनातील कथा यांमुळे रसिकांची उत्कंठा ताणली गेली असून, चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची प्रतीक्षा लागली आहे.(Naach Ga Ghuma Movie)

मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी यांनी चित्रपटाचे लेखन केले असून त्यांच्यासह शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, तृप्ती पाटील आणि स्वप्नील जोशी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. कामगार दिनी १ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'नाच गं घुमा'चे टप्प्याटप्प्याने आलेले टीझर, ट्रेलर आणि गाणी यांनी विविध माध्यमांवर उदंड प्रतिसाद मिळवला आहे.

महिलाप्रधान 'नाच गं घुमा' मध्ये मुक्ता आणि नम्रता यांच्याबरोबर सुकन्या कुलकर्णी, सुप्रिया पाठारे, सारंग साठे, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत आणि बालकलाकार मायरा वायकूळ यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी 'पॅनोरमा स्टुडिओज'ने स्वीकारली आहे.

मोलकरीण-गृहिणी यांचे नाते, त्याचे विविध पैलू, मोलकरणीवाचून ओढवणारे धर्मसंकट व तिची आपल्या आयुष्यातील अनिवार्यता, असा हा सगळा मामला अगदी वेगळ्या व मनोरंजक पद्धतीने 'नाच गं घुमा'मध्ये साकारला गेला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news