World’s Top 10 Billionaires : मुकेश अंबानी-गौतम अदानींच्या संपत्तीत घट; अंबानी टॉप 10 यादीतून बाहेर

World's Top 10 Billionaires
World's Top 10 Billionaires

पुढारी ऑनलाइन डेस्क : भारतीय अब्जाधीश मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे. तसेच जागतिक अब्जाधीशांच्या यादीतील स्थान घसरले आहे. इतकेच नव्हे तर टॉप 10 च्या यादीतून त्यांचे स्थान घसरले आहे. तर दुसरीकडे टॉप 10 यादीत अब्जाधीशांमध्ये चांगलीच कडक टक्कर दिसून येत आहे. तर पहिल्या क्रमांकासाठी अरबपती बर्नार्ड अरनॉल्ट आणि एलन मस्क यांच्यात सातत्याने कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे.

World's Top 10 Billionaires : मुकेश अंबानी आणि गौतम अदानी कितव्या स्थानावर

मुकेश अंबानी जागतिक श्रीमंतांच्या यादीत 13 व्या स्थानावर असून अदानी 23 व्या स्थानावर आहेत. या वर्षी जानेवारीमध्ये, अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर, अदानी समूहाच्या स्टॉकमध्ये मोठी घसरण झाली. एकेकाळी जगातील श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर असलेले गौतम अदानी हा अहवाल समोर आल्यानंतर ३७व्या क्रमांकावर पोहोचले होते. मात्र, काही दिवसात त्यांच्या स्टॉकमध्ये पुन्हा वाढ झाल्याने ते आता 23व्या स्थानावर आहेत. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, त्यांची एकूण संपत्ती $53.9 अब्ज आहे. अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानी 8 व्या स्थानावरून 13 व्या स्थानावर घसरले आहेत. त्यांची एकूण संपत्ती $84 अब्ज इतकी खाली आली आहे.

World's Top 10 Billionaires : अंबानी आणि अदानी यांचे किती नुकसान झाले

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या मालमत्तेचे यावर्षी मोठे नुकसान झाले आहे. जानेवारीपासून आतापर्यंत मुकेश अंबानींच्या संपत्तीत $3.10 अब्ज इतकी घट झाली आहे. अवघ्या २४ तासांत त्यांना ६८९ दशलक्ष डॉलर्सचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे गौतम अदानी यांना यंदा सर्वाधिक फटका बसला आहे. जानेवारीपासून आतापर्यंत त्यांनी $66.7 अब्ज संपत्ती गमावली आहे.

World's Top 10 Billionaires : कोण आहेत आत्ताचे टॉप 10 सर्वात श्रीमंत व्यक्ती
बर्नार्ड अर्नॉल्ट नंतर एलॉन मस्क, जेफ बेझोस – $ 139 अब्ज, बिल गेट्स – $ 125 अब्ज, वॉरेन बफे – $ 115 अब्ज, लॅरी एलिसन – $ 112 अब्ज, लॅरी पेज – $ 110 अब्ज, स्टीव्ह बाल्मर – $ 109 अब्ज, सर्जी ब्रिन – नवव्या क्रमांकावर 104 आणि दहाव्या क्रमांकावर कार्लोस स्लिम – $ 93.7 अब्ज

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news