मोनालिसा पेंटिंगमधील पुलाचे रहस्‍य उलगडले!: इटलीतील इतिहासकारचा दावा

मोनालिसा पेंटिंगमधील पुलाचे रहस्‍य उलगडले!: इटलीतील इतिहासकारचा दावा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जगविख्‍यात मोनालिसा पेंटिंगमध्‍ये (Mona Lisa Painting) दिसणार्‍या दगडी पूलाचे ( Bridge ) रहस्‍य उलगडले आहे, असा दावा इटालियन इतिहासकार सिल्‍व्‍हानो व्‍हिन्‍सेटी यांनी केला आहे. चित्रकार लिओनार्डो द विंची यांच्‍या या पेंटिंगमागील अनेक गूढ यामुळे संपुष्‍टात येतील, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला आहे.

यासंदर्भात 'द गार्डियन'शी बोलताना इतिहासकार सिल्व्हानो व्हिन्सेटी म्‍हणाले की, मोनालिसा पेंटिंगमधी पूल हा इटलीतील अरेझो प्रांतातील लॅटेरिना गावातील आहे. लिओनार्डो यांनी फ्लॉरेन्समध्ये मोनालिसा चित्र काढले. तैलचित्रात चित्रित केलेल्या स्त्रीच्या ओळखीबद्दल बर्‍याच अफवा आहेत. अठराव्या शतकात कदाचित पुरामुळे अर्नो नदीवरील या पुलाचे मोठे नुकसान झाले असावे. आज या पुलाची एक कमान शिल्‍लक आहे, असेही व्‍हिन्‍सेटी रोममध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

Mona Lisa Painting : पुलाची माहिती देणारे दस्‍तऐवज सापडले

फ्लॉरेन्सच्या राज्य पुरालेखागार कार्यालयात मेडिसी कुटुंबाशी संबंधित एक दस्तऐवज सापडला आहे. यामध्‍ये स्‍पष्‍टपणे म्‍हटलं आहे की, लिओनार्डो द विंची यांच्‍या कार्यकाळात हा पूल होता. त्‍याकाळात हा पूल उत्तरेकडील फ्लॉरेन्सला दक्षिणेकडील एरेझो या शहरांना जोडत होता. या काळात या पुलाचा वापर होत होता, हे सापडलेल्‍या दस्‍तऐवजावरुन स्‍पष्‍टहोते. लिओनार्डो द विंची यांनी १५०० दशकाच्‍या सुरुवातीस टस्‍कनीच्‍या भागातून प्रवास केला होता, असेही व्हिन्सेटी यांनी सांगितले.

अठराव्‍या शतकात आलेल्‍या पुरामुळे लॅटेरिना गावानजीकच्‍या पुलाचे मोठे नुकसान झाले. आता केवळ येथे एक कमान उरली आहे.
अठराव्‍या शतकात आलेल्‍या पुरामुळे लॅटेरिना गावानजीकच्‍या पुलाचे मोठे नुकसान झाले. आता केवळ येथे एक कमान उरली आहे.

चित्रातील पूल काल्‍पनिक नाही, …

मोनालिसा पेंटिंगमधील पूल बॉबीओ किंवा बुरियानोमधील नाही. तो लॅटरिना गावातील येथील आहे, हे सिद्‍ध करणारे पुरावे आमच्‍याकडे आहेत.  लिओनार्डो द विंची हे अतिशय वास्तववादी चित्र काढण्यासाठी प्रसिद्ध होते. त्‍यामुळे मोनालिसा चित्रातील पुल खरा आहे, असे सांगत माेनालिसा पेंटिंगमधील पूल हा काल्पनिक असू शकतो,  ही कल्‍पना व्‍हिन्‍सेटी यांनी फेटाळून लावली.

लॅटरिना गाव ठरणार पर्यटकांचे आकर्षण केंद्र

व्हिन्सेटी यांनी केलेल्‍या दाव्‍यामुळे लॅटारिना गाव चर्चेत आले आहे. येथील नागरिकांकडून आश्‍चर्य व्‍यक्‍त केले जात आहे. येथील महापौर सिमोना नेरी यांनी म्‍हटले आहे की, "या नव्‍या संशोधनामुळे आमचे गाव पर्यटकांच्‍या आकर्षणाचे केंद्र ठरणार आहेत. यामुळे पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल. हा पूल संरक्षित करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे, ज्यासाठी निधीची आवश्यकता आहे."

असे मानले जाते की, चित्रकार लिओनार्डो द विंची यांनी १५०३ ते १५१९ या कालावधीत मोनालिसा चित्र काढले असावे. त्‍यांचे शिल्पकला, संगीत आणि चित्रकला यासह अनेक विषयांवर प्रभुत्व होते. मोनालिसा चित्रातील पूल हा लॅटरिना येथील असावा, असा अंदाज सर्वप्रथम रोक्का नावाच्या स्थानिक समुदाय संघटनेने मांडली होती. त्यानंतर त्‍यांनी संशोधनाची जबाबदारी इतिहासकार सिल्व्हानो व्हिन्सेटी यांच्‍यावर सोपवली होती.

Historian,

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news