मुंबई : शिवाजीनगरमध्ये २ बंदुकींसह महिला ताब्‍यात!

file photo
file photo

मुंबई : पुढारी वार्ताहर शिवाजीनगर पोलिसांनी एका घरावर छापा टाकून दोन बंदुकींसह हिना रिहान खान (वय २४) या महिलेला ताब्यात घेतले आहे. या महिलेकडे आणखीन बंदुकी आहेत का? याबाबतचा अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.

या विषयी परिमंडळ ६ चे पोलीस उपायुक्त हेमराजसिंग राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका घरात बंदुकी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रजाने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नवले, जाधव व त्यांच्या पथकाने संशयित घराची झडती घेतली असता, त्यांना एक गावठी पिस्तुल, एक देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर व दोन जिवंत काडतुसे सापडली. अधिक चौकशीअंती हिना रिहान खान या महिलेला ताब्यात घेऊन तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news